Health : मित्रांची व्यायामाला दांडी ;पहाटेच मित्राच्या घरासमोर वाजवले भांडे-कुंडे; झोपेतून उठलेल्या मित्राला धाडले थेट मैदानात

 

ब्युरो टीम :  आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी व्यायमाला अनेक दिवसापासून दांडी मारणाऱ्या मित्राच्या घरावर पहाटेच मोर्चा वळविला. मित्राच्या घराबाहेर असलेले दार, भांडे-कुंडे वाजवून त्याला गाढ झोपेतून उठवून त्याला मैदानावर घेऊन जाण्यात आले. पहाटेच सुरु झालेल्या भांड्यांच्या आवाजाने संपूर्ण कॉलनीच जागी झाली होती.

मित्र आपली साथ देतात तशी वेळेला कानही पिळतात, मग तो कोणत्याही पद्धतीनं का असेनात. असाच प्रकार भिंगारमध्ये घडला. अशोक लोंढे (वय-54) यांचे ह्रद्याची शस्त्रक्रिया झाल्याने डॉक्टरांनी त्यांना नियमीत व्यायाम करण्याचा सल्ला दिला. मात्र वाढत्या थंडीमुळे सकाळी उठणे होत नसल्याने त्यांनी व्यायामाला दांडी मारण्यास सुरुवात केली. आपला ग्रुपचा सदस्य अनेक दिवसापासून येत नसल्याने सर्वांच्य लक्षात आले. त्याला अनेक वेळा सूचना देऊन देखील व्यायामासाठी तो हजर न झाल्याने सर्व सदस्यांनी पहाटे त्यांच्या घरी जाऊन त्याला उठवण्यासाठी भन्नाट युक्ती वापरली. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, अविनाश जाधव, विठ्ठलराव राहिंज, रमेश वराडे, मेजर दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, दीपकराव बडदे, दिलीप गुगळे, मनोहर दरवडे, सुमेश केदारे, एकनाथ जगताप, अशोक पराते, प्रकाश देवळालीकर, अनंत सदलापूर, अभिजीत सपकाळ, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, कुमार धतुरे, योगेश चौधरी, जहीर सय्यद, नंदू अहिरे, सुनील लालबोंद्रे, बबनराव चिंचिणे आदी उपस्थित होते.

पहाटेच दहा ते वीस सदस्य मित्राला घरी उठविण्यासाठी आल्याने लोंढे कुटुंबीयांची चांगलीच बंभेरी उडाली. हात जोडून दाराबाहेर पडलेल्या मित्राला तसेच गाडीवर बसवून व्यायामासाठी मैदान गाठण्यात आले. कॉलनीतील नागरिकांना नेमकं काय प्रकार आहे? हा समजल्यानंतर प्रत्येकाला हसू आवरेना. दिवसभर परिसरात या विषयावर चर्चा रंगली होती. पण आता यानंतर तरी हा मित्र सकाळी व्यायामासाठी न चुकता जाणार हे मात्र नक्की.

संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुप हे एक कुटुंब बनले असून, सर्व सदस्य एकमेकांची काळजी घेऊन त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होत असतात. सर्वांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमीत सकाळी भगवान गौतम बुध्द जॉगींग पार्क येथे योग-प्राणायाम व हास्य योग करण्यात येते. अनेक सदस्य पन्नाशी पुढचे असून, त्यांची व्यायामाने दिनचर्या सुरु होते. मात्र काही सदस्य दांडी मारु लागल्यास त्यांना इतर सदस्य मैदानावर घेऊन येत आहे. अशोक लोंढे यांनी सर्व सदस्यांनी घरी पहाटेच एकत्र येऊन उठविल्याने एक वेगळा सुखद धक्क बसला. धावपळीच्या जीवनात व्यायाम आवश्‍यक असून, मित्रांनी घेतलेली काळजी नक्कीच प्रेरणा देणारी ठरणार आहे. तर यापुढे मित्रांसाठी न चुकता मैदानावर व्यायामासाठी हजर राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने