ब्युरो टीम : आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडिया सर्वात आधी सेमी फायनलमध्ये पोहचली. टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 8 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाच वर्ल्ड कपमधील साखळी फेरीतील अखेरचा सामना हा 12 नोव्हेंबर रोजी नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे एम चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरु इथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यनाच्या 3 दिवसांआधी एक मोठी आणि वाईट बातमी समोर आली आहे. टीममधील स्टार खेळाडू वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे.
टीमला मोठा झटका
नेदरलँड्स क्रिकेट टीमचा स्टार बॉलर दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे. रायन क्लीन याला पाठीच्या दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलं आहे. नेदरलँड्स क्रिकेट टीमने सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. तर क्लीन याच्या जागी टीममध्ये नोहा क्रोस याचा समावेश करण्यात आला आहे.
नेदरलँड्सची वर्ल्ड कप 2023 मधील कामगिरी
नेदरलँड्स क्रिकेट टीमने 2011 नंतर यंदा 12 वर्षानंतर 2023 वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलं. नेदरलँड्सने आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. नेदरलँड्सने या स्पर्धेत अशी कामगिरी केली जी अद्याप कुणालाच जमली नाही. दक्षिण आफ्रिका टीमने या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 8 पैकी 6 सामने जिंकलेत. तर फक्त 2 सामने गमावले आहेत. त्यापैकी एक सामन्यात नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिका विरुद्ध जिंकला आहे. तसेच नेदरलँड्सने बांगलादेशवरही विजय मिळवलाय.
स्टार बॉलर ‘आऊट’
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
वर्ल्ड कपसाठी नेदरलँड्सची सुधारित टीम | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, नोहा क्रोस, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट.
टिप्पणी पोस्ट करा