ICC World Cup 2023 Final: फक्त १९८३ विश्वकप विजेत्या कर्णधारालाच नव्हे तर ICC च्या माजी अध्याक्षानाही निमंत्रण देण्याचा विसर

 

ब्युरो टीम: आयसीसी वर्ल्डकप 2023 वर नाव कोरण्याची टीम इंडियाची  इच्छा यंदाही अपूर्णच राहिली. मोठ्या शिताफिनं कांगारूंनी टीम इंडियाचा पराभव करत सहाव्यांदा वर्ल्डकपचा खिताब पटकावला. यंदा वर्ल्डकपचं यजमानपद भारताकडे होतं. वर्ल्डकप 2023 जेवढा रोमांचक होता, तेवढाच तो काही कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यातही अडकलाय.

वर्ल्डकपबाबतचा सध्याचा चर्चेत असलेला वाद म्हणजे, वर्ल्डकपच्या फायनलसाठी देश-विदेशातीह अनेक मान्यवर उपस्थित होते. परंतु, देशाला पहिला वर्ल्डकप पटकावून देणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार कपिल देव यांना मात्र आमंत्रण नव्हतं. यावरुन बीसीसीआयच्या आयोजनावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अशातच आता कपिल देव यांच्यासोबतच वर्ल्डकप फायनलसाठी आमंत्रण न मिळेल्या यादीमध्ये आणखी एका दिग्गज नावाचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. ते नाव म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचं. 

ICC चे माजी अध्यक्ष शरद पवारांनाही WTC फायनलचं आमंत्रण नाही 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही वर्ल्डकप 2023 च्या फायनलचं आमंत्रण देण्यात आलं नव्हतं, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. शरद पवार यांनी बीसीसीआय आणि आयसीसीचं अध्यक्ष पद भूषवलं आहे. त्यामुळे बीसीसीआकडून त्यांना आमंत्रण देणं अपेक्षित होतं. मात्र, बीसीसीआयनं शरद पवारांना फायनलचं आमंत्रण दिलेलं नव्हतं, अशी माहिती सूत्रांच्या वतीनं हाती आली आहे. 

कपिल देव यांनाही आमंत्रण नाही, म्हणाले, "कधी-कधी लोक विसरुन जातात"

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात वर्ल्डकपवर सर्वात पहिल्यांदा भारताचं नाव कोरणाऱ्या क्रिकेट संघाचे कर्णधार कपिल देव यांनाही बीसीसीआयकडून वर्ल्डकप फायनलचं आमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. घडल्या प्रकाराबाबत स्वतः कपिल देव यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. कपिल देव म्हणाले की, मला माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत हा प्रवास करायचा होता. पण मला त्या सोहळ्यासाठी आमंत्रणच दिलं नव्हतं. त्यांनी मला बोलावलं नाही, त्यामुळे मी गेलोच नाही. मला असं वाटत होतं की, अंतिम सामना पाहताना माझ्यासोबत 1983 ची संपूर्ण टीम असावी, परंतु मला असं वाटतंय की, खूप मोठं आयोजन होतं आणि कधीकधी लोक जबाबदाऱ्या सांभाळताना काही गोष्टी विसरुन जातात.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने