Icc World Cup : श्रीलंकेचा वर्ल्ड कपमधून बाजार उठला! बांगलादेशचा 3 विकेट्सने विजय,

 

ब्युरो टीम : बांगलादेशने श्रीलंकेवर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. श्रीलंकाने विजयासाठी दिलेलं 280 धावांचं आव्हान बांगलादेशने 7 विकेट्स गमावून 41 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. बांगलादेशचा वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका विरुद्धचा हा पहिलाच विजय ठरला. बांगलादेशने आपल्यासोबत श्रीलंकेलाही बुडवलंय. बांगलादेशच्या या विजयामुळे श्रीलंकाचा वर्ल्ड कपमधील प्रवासही इथेच संपलाय. अँजेलो मॅथ्यूज आणि शाकिब अल हसन यांच्यातील रायव्हलरीमुळे हा सामना चांगलाच चर्चेत राहिला.

बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | शकिब अल हसन (कॅप्टन), तन्झिद हसन, लिटॉन दास, नजमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, तॉहिद हृदोय, मेहदी हसन मिराझ, तन्झिम हसन साकिब, तस्किन अहमद आणि शोरीफुल इस्लाम.

श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, महेश तीक्षना, दुष्मंथा चमीरा, कसून रजिथा आणि दिलशान मदुशंका.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने