Icc World Cup : ICC ने जाहीर केली वर्ल्डकपची बेस्ट प्लेइंग इलेव्हन, रोहित शर्मा कॅप्टन



ब्युरो टीम : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २०२३ च्या विश्वचषकासाठी प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. सुमारे दीड महिना चाललेल्या या स्पर्धेत दमदार कामगिरीच्या जोरावर आयसीसीने आपल्या प्लेइंग इलेव्हन मध्ये ६ भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे. या टीमचा कॅप्टन  रोहित शर्माला बनवण्यात आलंय.

आयसीसीने या प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्व खेळाडूंना त्यांच्या कामगिरीच्या आधारे स्थान दिले आहे. यामध्ये भारताचे रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे सहा खेळाडू आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-ओपनर क्विंटन डी कॉकलाही या प्लेइंग-इलेव्हन मध्ये स्थान मिळाले आहे. तर चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघातील केवळ दोन खेळाडूंना प्लेइंग-इलेव्हन मध्ये स्थान मिळाले आहे. हे फिरकीपटू अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि फिरकीपटू अॅडम झाम्पा आहे. याशिवाय न्यूझीलंडच्या डॅरेल मिशेलला मधल्या फळीत स्थान मिळाले आहे. गोलंदाजीत श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाची प्लेईंग-इलेव्हन मध्ये निवड झाली आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेलॉर्ड कोएत्झी याला १२ वा खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड, नेदरलँड आणि बांगलादेशच्या एकाही खेळाडूला स्थान देण्यात आले नाही.

आयसीसीची वर्ल्डकप प्लेइंग इलेव्हन

क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, डॅरेल मिशेल, केएल राहुल, ग्लेन मॅक्सवेल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, दिलशान मदुशंका, अॅडम झम्पा आणि मोहम्मद शमी, जेराल्ड कोएत्झी (राखीव)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने