Icc world cup : पाकिस्थान चा पराभव करतइंग्लंडचा शेवट गोड ; दोन्ही संघ स्पर्धेबाहेर

 

ब्युरो टीम :  गतविजेत्या इंग्लंड क्रिकेट टीमने पाकिस्तान विरुद्ध आपल्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवून शेवट गोड केलाय. इंग्लंडने पाकिस्तानवर 93 धावांच्या फरकाने विजय मिळवलाय. आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आज 11 नोव्हेंबर रोजी डबल हेडर अर्थात 2 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर मात करत सलग सातवा सामना जिंकला. तर डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्या इंग्लंडने विजयी शेवट केला आहे. इंग्लंडने पाकिस्तानवर 93 धावांनी मात केली आहे. इंग्लंडने पाकिस्तानला विजयासाठी 338 धावांचे आव्हान दिलं होतं. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तान गुडघे टेकले. पाकिस्तान 43.3 ओव्हरमध्ये 244 धावांवर ऑलआऊट झाली. पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांचा साखळी फेरीतील अखेरचा सामना होता. दोन्ही संघांना वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये पोहचण्यात अपयश आलं. त्यामुळे या दोन्ही टीमचं पॅकअप झालं आहे.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गेस ऍटकिन्सन आणि आदिल रशीद.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर आणि हरिस रौफ.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने