Icc World Cup : अय्यरने दादा टाकले मागे ; मोडले मोठमोठे रेकॉर्ड

 

ब्युरो टीम : टीम इंडियाने बुधवारी 15 नोव्हेंबरला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिला सेमी फायनल सामना पार पडला. टीम इंडियाने न्यूझीलंडवर मातर करत वर्ल्ड कपमधील विजयीरथ कायम ठेवला. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 398 धावांचं अवघड आव्हान दिलं. न्यूझीलंडने या धावांचा पाठलाग करताना शानदार लढत दिली, मात्र मोहम्मद शमीच्या धारदार बॉलिंगसमोर किवी ढेर झाले. शमीने टीम इंडियाकडून सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. शमी वर्ल्ड कपमध्ये एका सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.


त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. टीम इंडियाकडून सर्वच फलंदाजांनी धमाकेदार कामगिरी केली. विराट कोहली याने एकदिवसीय कारकीर्दीतील 50 वं शतक ठोकत सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. विराटने टीम इंडियाकडून सर्वाधिक 117 धावांची खेळी केली. तर मुंबईकर श्रेयस अय्यर याने आपल्या घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये झंझावाती शतक ठोकलं. श्रेयसने या शतकादरम्यान तोडफोड बॅटिंग केली. श्रेयसने अवघ्या 70 बॉलमध्ये 105 धावांची शतकी खेळी केली. श्रेयसने या शतकासह वर्ल्ड कपमध्ये महारेकॉर्ड केला आहे.

श्रेयसनचं न्यूझीलंड विरुद्ध शतक हे वर्ल्ड कपमधील सलग दुसरं शतक ठरलं. श्रेयसने न्यूझीलंडआधी साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात 128 धावांची खेळी केली होती. श्रेयसने या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत टीम इंडियासाठी चौथ्या क्रमांकावर निर्णायक आणि मोठी भूमिका बजावली आहे.

श्रेयसची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

दरम्यान श्रेयस याने शतकासह मोठा रेकॉर्ड ब्रेक केलाय. श्रेयस वर्ल्ड कपमधील एका सामन्यात सर्वाधिक सिक्स ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. श्रेयसने न्यूझीलंड विरुद्ध 8 सिक्स खेचले. श्रेयसने यासह युवराज सिंह आणि सौरव गांगुलीला मागे टाकलं. या दोघांच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये एका सामन्यात प्रत्येकी 7-7 सिक्सची नोंद आहे. इतकंच नाही, तर श्रेयस टीम इंडियासाठी सेमी फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.

श्रेयसने याबाबतीत सौरव गांगुलीचा विक्रम मोडला आहे. दादाने 2003 सेमी फायनलमध्ये केनिया विरुद्ध 111 धावांची खेळी केली होती. तसेच टीम इंडियाकडून सेमी फायनलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा विराट कोहली याने आपल्या नावावर केला. विराटने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातच हा विक्रम केला.

न्यूझीलंड प्लेईंग इलेव्हन | केन विल्यमसन (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (विकेटकीपर), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्ट.

टीम इंडिया प्लेईग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने