ब्युरो टीम : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव करून सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. ऑस्ट्रेलियन संघाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या जेतेपदाची त्यांना खरंच किंमत आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. याला कारण ठरलाय ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममधला एक फोटो.
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या सेलिब्रेशनचा एक फोटो व्हायरल झाला असून त्यामध्ये मिचेल मार्श वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर पाय ठेवून बसला आहे. हे पाहून सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियन खेळाडूवर खूप टीका होत आहे. विशेष म्हणजे हा फोटो खुद्द ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टेटसवर शेअर केला आहे.
फोटोमध्ये नेमकं काय?
ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्यानंतर मार्शनेही तो फोटो रिपोस्ट केला आहे. या फोटोमध्ये मार्शच्या पायाखाली वर्ल्डकप ट्रॉफी असून तो सोफ्यावर आरामात बसला आहे आणि त्याने ट्रॉफीवर पाय ठेवले आहेत. ऑस्ट्रेलियाने विश्वचषक ट्रॉफी उचलल्यानंतर काही तासांनी हा फोटो शेअर करण्यात आला. फोटो हॉटेलच्या खोलीतील दिसत आहे जिथे ऑस्ट्रेलियन संघ बसून एकमेकांशी निवांतपणे बोलत होते आणि त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करत होते.
पण मिचेल मार्शला या फोटोवरून सोशल मीडियावर चांगलंच ट्रॉल केलं जात आहे. सहाव्यांदा विश्वचषकMitchell Marsh with the World Cup. pic.twitter.com/n2oViCDgna
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 20, 2023
जिंकल्यामुळे त्याची कदर नसल्याचे आणि वर्ल्डकप ट्रॉफीचा अनादर केला असल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा फोटो शेअर केला जात आहे. अनेक यूजर्सने यावर प्रतिक्रिया देत त्यांनी मार्शवर टीका केली. अनेक युजर्सने हा विश्वचषक स्पर्धेचा अपमान असल्याचे लिहिलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा