IFFI 2023 : गोव्यात इफ्फी महोत्सवाला शानदार सुरुवात, माधुरी दीक्षितचा झाला विशेष सन्मान



ब्युरो टीम : गोव्यात इफ्फी महोत्सवाला शानदार सुरुवात झालीय. इफ्फीच्या उद्घाटन कार्यक्रम गोव्यातील श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर उत्साहात पार पडला. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद पांडुरंग सावंत यांनी यंदाच्या इफ्फीचे उद्घाटन केले.

54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०ते २८ नोव्हेंबरपर्यंत गोव्यात रंगणार आहे.  जगभरातले सिनेप्रेमी इफ्फी महोत्सवाची वाट बघत असतात. गोव्यात होणाऱ्या या फेस्टिव्हलची शानदार सुरुवात झालीय. यंदा इफ्फीमध्ये माधुरी दीक्षित आणि भारतीय दिग्दर्शक-निर्माता करण जोहर यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींचा अनुराग ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जवान फेम साऊथ अभिनेता विजय सेथुपतीही उपस्थित होता. याशिवाय यंदा इफ्फीमध्ये प्रतिष्ठित सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता आणि निर्माता मायकेल डग्लस यांना प्रदान केला जाईल.

अनुराग ठाकूर यांनी यावेळी भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योगाबद्दलही सांगितले. ते म्हणाले की, ‘भारतीय मनोरंजन विश्व ही जागतिक स्तरावर पाचवी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आणि ही बाजारपेठ दरवर्षी वाढत आहे.’ 

दरम्यान, यंदा इफ्फीमध्ये सुमारे ३००० हून जास्त सिनेमांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील निवडक आणि दर्जेदार सिनेमे इफ्फी महोत्सवात पाहायला मिळणार आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने