IFFI GOA : मराठवाड्याचा'ग्लोबल आडगाव' चित्रपट; गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात

 

ब्युरो टीम : मराठवाड्यामध्ये अनेक लेखक आणि कलाकार घडताना नेहमीच दिसतात. मराठवाड्याच्या मातीतील अस्सल कलावंत, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता यांचा समावेश असलेल्या ग्लोबल आडगाव या चित्रपटाने नुकताच एक मोठा इतिहास हा रचला आहे. यामुळे ग्लोबल आडगाव चित्रपटाच्या टीमचे काैतुक सर्वचस्तरातून होताना दिसत आहे. भारत सरकारच्या वतीने गोवा येथे डिसेंबरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ग्लोबल आडगाव हा चित्रपट महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.


नुकताच याबद्दलची घोषणा ही, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलीये. यामुळे ग्लोबल आडगाव चित्रपटाच्या टीमचे काैतुक केले जात आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात परळीचे भूमिपुत्र जेष्ठ पत्रकार, लेखक तसेच नाटककार रानबा गायकवाड व प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांच्या भूमिका आहेत.

प्रतिष्ठित गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केट विभागात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी डॉ. अनिलकुमार साळवे लिखित-दिग्दर्शित ग्लोबल आडगाव या उत्कृष्ट मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटाची निर्मिती उद्योजक मनोज कदम, अमृत मराठे यांनी केली आहे. या चित्रपटाचा बोलबाल बघायला मिळतोय.

संत रामदास महाविद्यालयाचे नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी अभिनय-सहदिग्दर्शन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. ग्लोबल आडगाव या चित्रपटासोबतच गिरकी आणि बटरफ्लाय या चित्रपटांची देखील निवड ही करण्यात आलीये.

गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘दरवर्षी मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाकडून पाठवले जातात. विशेष म्हणजे यासाठी एक समितीची स्थापना देखील करण्यात आलीये. त्यानुसार चित्रपटांची निवड ही केली जाते. यावेळी ग्लोबल आडगाव चित्रपटाने मोठी बाजी मारल्याचे बघायला मिळतंय. गेल्यावर्षी यामध्ये राख या मराठी चित्रपटाचा जलवा बघायला मिळाला.



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने