IFFI GOA : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र शासनाकडून तीन मराठी चित्रपटांची निवड



ब्युरो टीम : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी यंदा महाराष्ट्र सरकारकडून तीन मराठी सिनेमांची निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून 'ग्लोबल आडगाव', 'गिरकी'  आणि 'बटरफ्लाय'   या तीन मराठी चित्रपटांची निवड केली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. 

गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'फिल्म बाजार ' या गटात दरवर्षी मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाकडून पाठवले जातात. या चित्रपटांची निवड करण्याकरता पाच सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. या समितीकडे एकूण २९ चित्रपटांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते.  श्रीमती किशोरी शहाणे ,  श्री प्रसाद नामजोशी,  श्री हर्षित अभिराज,  श्री. समीर आठल्ये आणि श्री संदीप पाटील यांच्या समितीने परीक्षणाअंती त्यापैकी 'ग्लोबल आडगाव',  'गिरकी' आणि 'बटरफ्लाय' या तीन चित्रपटांची निवड केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने