IND vs AUS : महेद्रसिंग धोनीच्या सल्ल्याने षटकार मारून जिंकला भारत;ऑस्टेलिया विरुद्धसामान्या नंतर रिंकू सिंगने सांगितले स्पष्ट ..

 

ब्युरो टीम : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 209 धावांचं कठीण आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 20 षटकात 8 गडी गमवून पूर्ण केलं. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. शेवटच्या चेंडूवर रिंकू सिंह याने षटकार मारला. पण नो बॉल असल्याने षटकाराच्या आधीच सामन्यात विजय मिळाला. त्यामुळे 19.5 षटकात टीम इंडियाने विजय मिळवला. त्यामुळे टीम इंडियाच्या आणि रिंकूच्या धावसंख्येत षटकार गणला गेला नाही. पण असं असलं तरी शेवटच्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर रिंकू सिंहने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या षटकारामागे महेंद्रसिंह धोनी याची प्रेरणा असल्याचं रिंकू सिंह याने सांगितलं आहे. बीसीसीआय टीव्हीशी बोलताना रिंकू सिंह याने याबाबत सांगितलं आहे.

काय म्हणाला रिंकू सिंह?

“महेंद्रसिंह धोनी याच्याशी एकदा बोलणं झालं होतं. तेव्हा मी त्याला विचारलं होतं की तू शेवटच्या षटकात काय करतो? तेव्हा त्याने जितकं शांत राहाल तितकं चांगलं राहील. त्याचबरोबर सरळ मारण्याचा विचार केला तर जास्त बरं होतं. मी तेच फॉलो करत आहे. जितकं शांत राहता येईल तितकं राहण्याचा प्रयत्न करतो. कोणतीच रिअॅक्शन देत नाही. त्यामुळे फायदा होतो.”, असं रिंकू सिंह याने सांगितलं.

“शेवटचा चेंडू नो बॉल होता हे माहिती नव्हतं.ड्रेसिंग रुममध्ये गेल्यावर मला कळलं की तो नो बॉल होता. पण ते काही महत्त्वाचं नाही. मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे.”, असं रिंकू सिंह याने सांगितलं. रिंकू सिंह याने 14 चेंडूत नाबाद 22 धावांची खेळी केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी20 सामना 26 नोव्हेंबरला होणार आहे.

दोन्ही संघांतील खेळाडू

टीम इंडिया : रिंकू सिंह, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा, रवि बिष्णोई.

ऑस्ट्रेलिया : डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, टिम डेविड, ट्रॅव्हिस हेड, एरोन हार्डी, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅट शॉर्ट, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड, एडम झाम्पा, जेसन बेहरनड्रॉफ, केन रिचर्डसन, नॅथन इलिस, सीन एबॉट, स्पेन्सर जॉन्सन, तनवीर संघा.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने