Jitendra Avhad : शरद पवारांच्या वाढदिवशी शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी ; जितेंद्र आव्हाडांचे सूचक

 

ब्युरो टीम : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहे. सत्ताधारी पक्षांकडून राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघावर जिंकण्यसाठी रणनीती आखली जात आहे. तर विरोधी पक्षांकडून सत्ताधारी पक्षांच्या पराभवासाठी रणनीती आखली जात आहे. असं असताना आता विरोधी पक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मोठं शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पुढच्या महिन्यात 12 डिसेंबरला वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीकडून जंगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. शरद पवार गटाकडून जाहीर सभेचं आयोजन केलं जात आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत एकत्रितपणे ही सभा घेण्याचा शरद पवार गटाचं नियोजन सुरु असल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. पण याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, असं आव्हाड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. “12 तारखेला शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्या दिवशी प्रयत्न आहे की, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना एकत्रित करून सभा घ्यायची. त्यात शरद पवार तर असतीलच. यावेळी सगळ्या पक्षांना एकत्र करून सभा घ्यायची, असा प्रयत्न आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने