ब्युरो टीम : कंगना रनौतचा एरियल ॲक्शन थ्रिलर चित्रपट तेजस नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाकडून सर्वांना खूप अपेक्षा होत्या, पण बॉक्स ऑफीसवर चित्रपटाने फारशी काही कमाई केली. एकंदर तो फ्लॉपच ठरला. चित्रपट तर 10 कोटी रुपये देखील कमवू शकला नाही. तेजस सुपर फ्लॉपनंतरही कंगनाने हार मानलेली नाही, तिने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली असून तिच्या पुढच्या चित्रपटावरही काम सुरू केले आहे. शनिवारी अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर याची घोषणा केली. विशेष म्हणजे या चित्रपटाद्वारे कंगना आणि आर.माधवनची लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
कंगनाने केली नव्या चित्रपटाची घोषणा
कंगनाने मायक्रोब्लॉगिंग साइट X (पूर्वीचे ट्विटर) वर नव्या चित्रपटाची घोषणा केली. एका सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटाचे शूटिंग सुरू केल्याचे तिने जाहीर केले. मात्र असं असलं तरी कंगनाने अदून तिच्या आगामी चित्रपटाचे टायटल जाहीर केलेल नाही. कंगनाने इन्स्टाग्रामवरही हा फोटो पोस्ट करत घोषणा केली. “ आज चेन्नईमध्ये आम्ही आमच्या नवीन, एका सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. बाकीचे डिटेल्स लवकरच सांगेन. ‘असंही तिने नमूद केलं.
या पोस्टद्वारे तिने सर्वांचे आशीर्वादही माहितले आहे. आजपासून सुरू होणाऱ्या नव्या प्रवासासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची आणि प्रेमाची आवश्यकता आहे, असे कंगनाने लिहीलं आहे. दिग्दर्शक ए एल विजय सोबतही तिने नवा फोटो शेअर केला. एवढेच नव्हे तर तिने आर.माधवनसोबत असलेला एक जुना फोटो शेअर करत ‘ते परत आले आहेत’ अशी कॅप्शनही लिहीली आहे.
आर.माधवन आणि कंगनाने यापूर्वी ‘तनू वेड्स मन्नू’ आणि ‘तनू वेड्स मन्नू रिटर्न्स’ या दोन्ही चित्रपटात काम केले होते. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट ठरले आणि त्या दोघांची जोडीदेखील प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने आर.माधवन आणि कंगना आठ वर्षांनी पुन्हा एकत्र झळकणार असून त्यांना पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.
कंगनाचे आगामी प्रोजेक्ट्स
कंगना रनौत नुकतीच ‘तेजस’मध्ये दिसली होती. या चित्रपटात अभिनेत्रीने एअरफोर्स पायलट तेजस गिलची भूमिका साकारली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा फ्लॉप ठरला. आता कंगना ‘इमर्जन्सी’ या पॉलिटिकल ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. कंगनाशिवाय अनुपम खेर, महिमा चौधरी आणि श्रेयस तळपदे यांसारख्या अनेक दमदार स्टार्सनी ‘इमर्जन्सी’मध्ये काम केले आहे. हा चित्रपट आधी याच वर्षी प्रदर्शित होणार होता पण नंतर त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. आता ‘इमर्जन्सी’ पुढच्या
टिप्पणी पोस्ट करा