Kids Health : वाढता स्क्रिन टाइम मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक; मानसिकतेवर परिणामकरतो परिणाम, काळजी घ्या

 

ब्युरो टीम : बदलेल्या जगानुसार स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही आपल्या आयुष्याचा भाग बनला आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मोबाइल फोन लागतो. झोपेतून उठल्यानंतर ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक जण मोबाइलच्या आहारी गेले आहेत.

वाढत्या स्क्रीन टाइमचा सगळ्यात जास्त परिणाम हा लहान मुलांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. त्यामुळे मुले खेळण्याच्या वयात, खाताना किंवा अभ्यास करताना देखील फोन घेऊन बसतात. परंतु, मुलांच्या आरोग्यासाठी इतका स्क्रीन टाइम योग्य आहे का? 

संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, वाढत्या स्क्रीन टाइमचा मुलांच्या (Kids) मेंदूवर परिणाम होतो आहे. यामुळे त्यांच्या मेंदूचे व्यवस्थितरित्या वाढ होत नाही. सतत स्क्रीन पाहिल्यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. एकाच जागी बसल्याने किंवा कोणतीही अॅक्टिव्हिटी न केल्याने वजन वाढते. मेंदूला कोणत्याही प्रकारची चालना मिळत नाही. यासाठी पालकांनी कोणती काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया.

जेवताना मुलांना फोन  किंवा टीव्ही पाहू देऊ नका. जेवताना मुले विचलित झाल्याने ते व्यवस्थितरित्या जेवत नाही. त्यामुळे जेवताना त्यांच्याशी बोला ज्यामुळे त्यांना कंटाळा येणार नाही.

फोन, टॅबलेट, लॅपटॉप इत्यादी वस्तू मुलांच्या जवळ ठेवू नका. त्यामुळे त्यांचे लक्ष सतत इलेक्ट्रॉनिक वस्तूंकडे जाते. तसेच झोपण्याच्या एक तासाआधी त्यांना फोन वापरायला देऊ नका.

व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी त्यांना बाहेर जाऊन खेळण्यास सांगा. ज्यामुळे त्यांच्या शरीराची हालचाल होईल. स्क्रीन टाइम कमी होईल तसेच शारीरिक हालचाली केल्याने आरोग्यही सुधारेल. मुलांना असे गेम खेळायला द्या. ज्यामुळे त्यांच्या मेंदूला चालना मिळेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने