Maratha Reservation : मराठा समाजाला झुलवत ठेऊ नका, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांनी आरक्षणाचा शब्द पाळावा; एकनाथ खडसे यांची मागणी

 

ब्युरो टीम: मराठा समाजाला आरक्षण  दिलं नाही तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ अशा प्रकारचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मागील काळात केले होते, त्यामुळे देवेंद्र फडणीस यांनी आपला शब्द पाळावा आणि मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी आता राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. यावेळी संकटमोचक म्हणून नावारूपाला आलेल्या मंत्री गिरीश महाजन  यांनीही यातून मार्ग काढावा असंही ते म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकनाथ खडसे यांना राज्य सरकारच्या भूमिकेवर चांगलीच टीका केली. 

एकनाथ खडसे म्हणाले की, मराठा आरक्षण देण्या संदर्भात सरकारने सुरुवातीला काही दिवसांची मुदत मागितली होती, त्यांनतर पुन्हा त्यांनी मुदत वाढून घेतली असल्याने साहजिकच आरक्षण मिळण्यासंदर्भात मराठा समाज्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे सरकारने लवकर निर्णय घ्यावा. सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर बिहारच्या धर्तीवर 16 टक्के जास्तीचं कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्यायला पाहिजे. मात्र मराठा समाजाला वारंवार झुलवत ठेवणे आणि खेळवत राहणे राजकीय दृष्ट्या योग्य नाही.

जालना येथील पोलीस अधीक्षक यांच्याबदली बाबत आपण आताच काही बोलू शकत नाही. कारण बदली ही प्रशासकीय बाब आहे असं एकनाथ खडसे म्हणाले. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने