ब्युरो टीम : आजकाल जगभरातील लोकांमध्ये एकाकीपणाची समस्या अधिक प्रमाणात दिसून येतेय. विशेषत: वयोवृद्ध लोक त्याचे बळी ठरतायत. WHO च्या अहवालानुसार, चारपैकी एक वृद्ध व्यक्ती एकाकीपणाचा बळी ठरत आहे. यामध्ये तरूणांचाही तितकाच समावेश आहे. आजकालच्या धावपळीच्या काळात कामाचा वाढता ताण आणि व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात मागे राहण्याबद्दल असुरक्षिततेची भावना यांसारखी अनेक कारणे यामागे आहेत ज्यामुळे एकटेपणा वाढू शकतो. त्याच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे, अन्यथा परिस्थिती गंभीर होऊन व्यक्ती नैराश्याची शिकारही होऊ शकते.
एकाकीपणाशी झुंजत असलेल्या व्यक्तीमध्ये काही लक्षणे सामान्य आहे. जाणून घ्या एकाकीपणाची लक्षणे आणि ते टाळण्यासाठी काही उपाय.
झोपेचं पॅटर्न बदलणे
जे लोक एकाकीपणाचा सामना करतात त्यांच्या झोपेच्या पद्धतींमध्ये बदल होऊ शकतात, जसे की, रात्री नीट झोप न येणे किंवा सतत झोप येणे. तसेच, यामागे इतर अनेक कारणे असू शकतात, जसे की पोषक तत्वांचा अभाव किंवा इतर कोणतीही आरोग्य समस्या.
स्वतःला नेहमी कामात व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करणे
एकटेपणाच्या समस्येमुळे, लोकांना अनेकदा शरीरात ऊर्जा कमी जाणवते आणि ते कोणत्याही कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. तसेच, एकटेपणाचा सामना करणारे लोक देखील स्वतःला जास्त व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात.
लोकांपासून दूर राहणे आणि स्क्रीन टाईम वाढवणे
जे लोक एकाकीपणाने त्रस्त असतात त्यांना लोकांमध्ये अस्वस्थता जाणवू लागते आणि म्हणूनच ते इतरांशी बोलणे टाळतात. सामाजिक जीवनाऐवजी, हे लोक सोशल मीडियावर अधिक वेळ घालवू लागतात.
'ही' लक्षणे देखील दिसू शकतात
जर आपण एकाकीपणाला बळी पडलेल्या लोकांबद्दल बोललो, तर भूक न लागणे, वजन कमी होणे, अस्वस्थता जाणवणे, डोकेदुखी, पोटदुखी यांसारख्या समस्या त्यांच्यातही दिसून येतात. त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक लक्षणांकडेही लक्ष दिले पाहिजे.
एकटेपणापासून स्वतःचे रक्षण कसं कराल?
एकटेपणा टाळण्यासाठी, कुटुंब आणि मित्रांमध्ये वेळ घालवा. यासाठी तुम्ही कुठेतरी सहलीचे नियोजन करू शकता. याशिवाय, नृत्य, संगीत, गायन, स्वयंपाक किंवा इतर कोणतेही आवडते काम करू शकता. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान आणि योगासाठी थोडा वेळ काढा. तरी लक्षणे जाणवली तरी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
टिप्पणी पोस्ट करा