Nashik : नाशिक महानगरपालिका आणि एनसीसी च्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम

 

ब्युरो टीम : नाशिक महानगरपालिका आणि सेव्हन महाराष्ट्र बटालियन एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आज एनसीसी दिनाच्या निमित्ताने चोपडा लॉन्स येथील पेरूच्या बागेमध्ये साफसफाई मोहीम राबवण्यात आली. यावेळी सेव्हन महाराष्ट्र बटालियनचे कर्नल तरुण खन्ना आणि नाशिक महानगरपालिका उपायुक्त डॉ.विजयकुमार मुंडे यांनी देखील या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला. 

याअनुषंगाने आज शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यात आली सोबतच चित्रकला स्पर्धा, स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त नाशिक शहर यावर सुयोजित गार्डन येथे पथनाट्यसादर करून जनजागृती करण्यात आली. चित्रकला आणि पथनाट्य सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना उपायुक्त विजयकुमार मुंडे व कर्नल तरुण खन्ना यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

उपयुक्त डॉ.विजयकुमार मुंडे, पर्यावरण विभाग प्रमुख, नाशिक महानगरपालिका यांनी सर्वांना पर्यावरणाचे संरक्षण करणे का गरजेचे आहे आणि सद्य स्थितीत मुंबई, दिल्ली या ठिकाणी जी काही पर्यावरणासंदर्भात घातक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने आपलं नाशिक शहर स्वच्छ सुंदर आणि प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी आपण काय पावलं उचलली पाहिजेत या संदर्भात मागदर्शन केले. त्यामध्ये गाडी चालवत असताना सिग्नल वरती गाडी बंद करून ठेवावी, पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्तीत जास्त वापर करावा, कचरा जाळू नये ,जास्तीत जास्त झाडे लावावीत असा संकल्प या नवीन वर्षात करावा आणि इतरांनाही करायला सांगावा असे विद्यार्थांना प्रतिपादन केले

२५ नोव्हेंबर हा दिवस एनसीसी दिवस म्हणून का साजरा केला जातो? एनसीसी ची स्थापना का केली गेली? याबद्दल माहिती  महाराष्ट्र बटालियनचे कर्नल तरुण खन्ना यांनी सहभागींना दिली. तसेच सहभागी सर्व नागरिकांबरोबर आणि विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी संवाद साधला आणि त्याबद्दल त्यांचे त्यांनी आभार मानून पुढील कार्यक्रमात हि असाच सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले

या मोहिमेच्या माध्यमातून सर्व एनसीसी कॅडेट आणि तेथील नागरिकांनी येणाऱ्या नवीन वर्षासाठी एक संकल्प हाती घ्यावा आणि इतरांना सुद्धा आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी संदेश द्यावा असे आवाहन तरुण खन्ना आणि विजयकुमार मुंडे यांनी सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना, स्वयंसेवी सेवकांना आणि संस्थांना केले.

ही स्वच्छता मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी घनकचरा विभागाचे संचालक डॉ.आवेश पलोड आणि विभागातील सहकारी यांनी अतिशय चांगले सहकार्य केले व स्वतः या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होऊन उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी स्वच्छतेबद्दल माहिती दिली.या मोहिमेच्या माध्यमातून उपस्थितांना  स्वच्छतेचे  महत्व सांगून स्वच्छता करण्याची का गरज आहे? आणि ओला सुखा कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा, काचेचा कचरा किंवा प्लास्टिक चा वापर का टाळला पाहिजे याबद्दल घनकचरा विभागाचे संचालक आवेश पलोड यांनी सर्वांना माहिती दिली.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने