Nitesh Rane : ड्रगमुक्तीची सुरुवात मातोश्री पासून करा ; संजय राऊतांच्या टीकेला नितेश राणेचं प्रत्यत्तर

 

ब्युरो टीम : ड्रग्ज प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला आता भाजप आमदाराने उत्तर दिलं आहे. ड्रगमुक्त महाराष्ट्राची सुरवात मातोश्री पासून करा. दुसऱ्यांना नौंटकी बोलण्याऱ्या संजय राऊतचं आयुष्य तमासगीर सारखं आहे. ते तरी प्रामाणिक असतात. बीएमसीचं टेंडर कोणाला द्यायचं ते सांगावं लागेल. तेव्हा तुझ्या मालकाचा मुलगा पळून जाईल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सचिन वाझे वर्षा बंगल्यावर येऊन राहायचा. दुसऱ्यांना बोलण्यापूर्वी तुम्ही काचेच्या घरात राहता हे लक्षात ठेवा, असं म्हणत भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

कोरोनानंतर सर्वात गतीने वाढणारी अर्थ व्यवस्था म्हणजे भारत. या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंच्या अनाडी कामगाराला कधीच कळणार नाहीत. बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचा चढता आलेख होता. आता उद्धव ठाकरेच्या कारकिर्दीत ठाकरे गट नावाचं छोटं मित्रमंडळ झालं आहे. याबाबत संजय राऊत यांनी अग्रलेख लिहावा, असं नितेश राणे म्हणालेत.

तुझ्यासारख्या चवन्नी लोकांनी शिवसेनेची ही अवस्था केली. आदित्य ठाकरे दिनोच्या घरी आयुर्वेदिक उपचारासाठी जायचा का? सत्य नारायण पूजेला जायचं का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंढरपूरला पूजा करायला गेले असताना आदित्य ठाकरेमध्येच उठून गेलेला. कुठल्या नशेत होता? तुझा मालकाचा मुलगा किती शुद्ध आहे? कोणकोणत्या ड्रग माफियासोबत पार्टी करतो ते सांगावं लागेल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

देशात जे खतरनाक अंमली पदार्थांचा व्यापार करतात, त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहतात. त्याची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का? याचा शोध घेण्याची गरज आहे, असं संजय राऊत म्हणाले होते. सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. त्याला नितेश राणे यांनी आता उत्तर दिलं आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलं तर तुझ्या मालकाच कुटुंब आर्थर रोड जेलमध्ये असेल. कोणीही नाराज नाही. मुख्यमंत्री साहेबांना प्रत्येक आमदाराला मार्गदर्शन करण्याचे अधिकार आहेत, असंही नितेश राणे म्हणालेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने