ब्युरो टीम : मराठी मनोरंजनसृष्टीतील 'कलरफुल' अभिनेत्री पूजा सावंतने 28 नोव्हेंबर 2023 रोजी जोडीदारासोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. पण या फोटोंमध्ये तिने जोडीदाराचा चेहरा लपवला होता. त्यामुळे पूजा सावंतचा होणारा नवरा कोण? हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर अभिनेत्रीने आज तिच्या जोडीदाराचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. गावच्या पोरांनी, रानाच्या मोरांनी,शिवारी साऱ्यांनी पाहिले नाsss हे पूजाच्या 'निलकंठ मास्तर' या सिनेमातील 'अधीर मन झाले' गाण्याचे बोल आता खरे ठरले आहेत.
पूजा सावंतच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्देश चव्हाण आहे. सिद्देशसोबतचे रोमँटिक फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"आयुष्याचा नवा अध्याय तुझ्यासोबत सुरू करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे". पूजाने शेअर केलेल्या पोस्टवर भाऊजी नमस्कार, लक्ष्मी नारायणाचा जोडा, अशा कमेंट्स करत अभिनेत्रीचं आणि सिद्देशचं अभिनंदन केलं आहे.
पूजा सावंतने तिचं रिलेशन कायम गुलदस्त्यात ठेवलं. इंडस्ट्रीतील तिच्या जवळच्या मित्र-मंडळींना मात्र सिद्देशबद्दल माहिती होतं. अभिनेत्रीने फोटो शेअर केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट्सचा वर्षाव केला आहे. दरम्यान अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने केलेल्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 'अॅन्ड द डिज्नी फिल्म्स बिगिंस' अशी कमेंट त्याने केली होती. त्यानंतर सिद्धार्थ डिज्नी कंपनीत कामाला असल्याची चर्चा रंगली. तर दुसरीकडे सिद्धार्थ ऑस्ट्रेलियात राहत असल्याचीदेखील चर्चा आहे.
पूजा सावंत लवकरच अडकणार लग्नबंधनात
पूजा सावंत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीच्या लग्नासाठी चाहते आता उत्सुक आहेत. पूजाने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. पूजाने फोटो शेअर करत लिहिलं आहे,"आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात एका खास व्यक्तीसोबत, प्रेमाचा हा नवा प्रवास..we are engaged".
पूजा सावंतचं नाव अभिनेता वैभव तत्तववादी आणि भूषण प्रधान बरोबरही जोडलं गेलं होतं. पूजाने दगळी चाळ, क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. तिचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. पूजाच्या लग्नसोहळ्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत.
टिप्पणी पोस्ट करा