ब्युरो टीम : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर भाष्य केलं. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महत्वाचं विधान केलं. आता परत मला इतिहास सांगयची गरज नाही. मंडल आयोगाबाबतचा इतिहास पाहा तुम्हाला कळेल. छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच होतो. न्यायालयात पलटवार मीच केला. त्यांनी त्याबाबत कधी माझे आभार मांडले नाहीत. मला कोणत्याही व्यक्तीची गरज नाही. जरा इतिहास सुधारून घ्या. मग कळेल… ओबीसीचा लढ्याचा जनक मी आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
स्त्री शिक्षणासाठी लढा उभारणारे महात्मा फुले यांचा आज स्मृतीदिन आहे. पुण्यातील महात्मा फुले वाड्यात जात प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा फुलेंना अभिवादन केलं. यावेळी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं. महात्मा फुले यांनी जो लढा सुरू केला. त्याची फळं आपण चाखतो आहोत. त्यांच्या त्या लढ्यामुळे आपल्याला सामाजिक धार्मिक स्वतंत्र मिळालं, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
आज देशात हिंदू असूनही देशात पुन्हा वैदिक परंपरा सुरू कराव्या आशा मागणी होत आहे. आरआरएस किंवा विश्व हिंदू परिषद नसलं म्हटलं तरी देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं आहे की, संविधान बदलणार नाही. पण जोपर्यंत आरआरएसचे प्रमुख मोहन भागवत हे जोपर्यंत अस वक्तव्य करत नाही तोवर आम्ही मान्य करणार नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
टिप्पणी पोस्ट करा