Pune Manse : मनसे पुणे लोकसभा लढणार ; राज ठाकरेंनी अत्यंत घरातल्या माणसावर सोपवली महत्वाची जबाबदारी


ब्युरो टीम ; केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यातील निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. या पाच राज्यातील निवडणुकीतील पहिल्या टप्प्यास आजपासून प्रारंभ झाला. ७ नोव्हेंबर रोजी छत्तीसगड विधानसभेसाठी मतदान होणार आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणूक ही लोकसभेची सेमीफायनल म्हटली जात आहे. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये होणार असून त्यासाठी आचारसंहिता जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारी महिन्यात लागणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपसह इतर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्र नवीननिर्माण सेनेकडून लोकसभेची तयारी सुरु केली आहे. यासाठी राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना जबाबदारी दिली आहे.

अमित ठाकरे यांनी दिले लक्ष

अमित ठाकरे यांनी पुणे लोकसभेवर लक्ष केंद्रित केलं आहे. यामुळे राज ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरे यांचे पुणे दौरे वाढले आहे. अमित ठाकरे पुन्हा दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहे. ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी अमित ठाकरे पुण्यात आहे. या दौऱ्यात ते प्रभागनिहाय आढावा घेणार आहे. त्यासाठी आज आणि उद्या मनसेच्या बैठकीचं सत्र आयोजित केले आहे. मनसेकडून लोकसभा निवडणुकीबरोबर मनपा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी चाचपणी अमित ठाकरे करणार आहे

मनसेकडून कोण आहेत इच्छुक

पुणे लोकसभेसाठी मनसेकडून माजी शहराध्यक्ष, माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी तयारी सुरु केली आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. तसेच मनसे कार्यकर्ते भावी खासदार म्हणून सातत्याने वसंत मोरे यांचा उल्लेख करत आहे. तसे बॅनरही लावले आहे. पुणे मनसे शहरध्यक्ष साईनाथ बाबर यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. यामुळे राज ठाकरे यांची पसंत कोण ठरणार? हा महत्वाचा विषय आहे. राज ठाकरे यांनी मशिदीसंदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर वसंत मोरे यांनी वेगळी वाट धरली होती. त्यानंतर राज ठाकरे वसंत मोरे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होत असते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने