R. Ashvin ; मला फसवले; विश्वकप पराभवानंतर आर. अश्विनचा रोख कुणाकडे

 

ब्युरो टीम : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेला वर्ल्ड कप 2023 फायनल सामना प्रत्येक भारतीयाच्या मनात जखम करून बसला आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये अपराजित राहिलेल्या भारतीय संघाचा पराभव करत ऑस्ट्रेलिया संघ सहाव्यांदा चॅम्पियन झाला. या वर्ल्ड कपमध्ये अनुभवी खेळाडू आर. अश्विन याला फक्त एका सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर एकाही सामन्यात भारताच्या प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही. या पराभवानंतर बोलताना आर. अश्विनने त्याला धोका दिल्याचं म्हटलं आहे.

आर. अश्विन काय म्हणाला?

ऑस्ट्रेलिया संघाने नशिबाने नाहीतर एक चांगली रणनिती आखत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. फायलनमधील त्यांनी केलेला खेळ मी अगदी जवळून पाहिला आहे. फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया संघ एक पाऊल आपल्या पूढे होता. कमिन्स आणि ऑस्ट्रेलिया संघाने एक प्रकारे माझी फसवणूक केली. मला वाटलं होतं की ऑस्ट्रेलिया संघ टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. कारण त्यांची ही परंपरा राहिल्याचं अश्विन म्हणाला.

भारताचा डाव झाल्यानंतर मी खेळपट्टी पाहिली आणि ऑस्ट्रेलियाचे निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेलीला भेटलो. त्यांना विचारलं की तुम्ही पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय का घेतला? यावर पिच हे काळ्या मातीचं होतं, अशा पिचवर दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करणं योग्य ठरत असल्याचं त्यांनी सांगितल्याचं अश्निन म्हणाला. आर. अश्विन त्याच्या यु-ट्यूब चॅनेलवर बोलताना त्याने हे सर्व सांगितलं.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना लाल मातीच्या पिचवर खेळला गेला होता. त्यामुळे आम्हाला समजलं की लाल मातीच्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणे चांगले होईल. तर काळी माती असलेल्या पिचवर नंतर फलंदाजी करणे योग्य ठरणार जॉर्ज बेलीने अश्विनला सांगितलं.

दरम्यान, एकंदरित कांगारूंनी सर्व गोष्टींचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला होता. भारताच्या एक पाऊल पुढे जात त्यांनी विचार केला होता, त्यामुळे शेवटच्या सामन्यात कांगारूंनी मैदानात उतरण्याआधी पिचपासून सर्व गोष्टी चाचपून पाहिल्या होत्या.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने