ब्युरो टीम : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना डेंग्यूची लागण झालीय. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत होती. पण काल अचानक मोठी बातमी समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाल्याची माहिती समोर आली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीनंतर अजित पवार लगेच पुण्याहून दिल्लीच्या दिशेला रवाना झाले.
अजित पवारांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी संध्याकाळी अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या सगळ्या घडामोडींवर आता आमदार रवी राणा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार लवकरच भाजपला पाठिंबा देतील, असं स्पष्ट वक्तव्य रवी राणा यांनी केलंय. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.
“शरद पवार लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील”, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. “अजित पवारांच्या भेटीमुळे शरद पवार 99 टक्के कन्व्हेन्स झाले आहेत”, असं रवी राणा म्हणाले आहेत. “मी आधीच सांगितलं होतं, दिवाळीच्या आसपास मोठा बॉम्ब फुटू शकतो”, असं रवी राणा म्हणाले आहेत.
रवी राणा नेमकं काय म्हणाले?
“मी आधीच दसरा सणाच्या वेळी सांगितलं होतं की, शरद पवार हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. दिवाळीच्या आधी मोठा फटका फुटू शकतो किंवा दिवळीच्या आसपास मोठा बॉम्ब फुटू शकतो. अजित पवार यांनी ज्या पद्धतीने शरद पवारांची भेट घेतली आहे, मला असं वाटतं की 99 टक्के शरद पवार कन्व्हेन्स झाले आहेत. आता थोडासा धक्का लागायला पाहिजे”, असं मत रवी राणा यांनी व्यक्त केलंय.
“शरद पवार लवकरच नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील. ते भाजप सरकारसोबत येतील. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष संपेल आणि मोठं ताकदवान सरकार या महाष्ट्रात उभं राहील. जे समीकरणं दिल्ली स्तरावर चालू आहेत, आजपर्यंत ज्या घटना झालेल्या आहेत त्या अचानक झालेल्या आहेत. अशाचप्रकारे शरद पवार सोबत आले तर सरकारला आणखी ताकद मिळेल. सक्षम मजबूत सरकार महाराष्ट्रात काम करेल”, असा दावा रवी राणा यांनी केलाय.
टिप्पणी पोस्ट करा