ब्युरो टीम : टीम इंडियाने यंदाच्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये जबरदस्त खेळ दाखवलाय. आता फक्त आणखी एक विजय हवा, मग वर्ल्ड कप उंचावण्याचा मान पुन्हा एकदा भारताला मिळणार आहे. टीम इंडियाच्या या विजयात प्रत्येक खेळाडूच योगदान आहे. खासकरुन रोहित शर्माच्या नेतृत्व गुणांच सुद्धा कौतुक कराव लागेल.
भारताने बुधवारी सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला धूळ चारली. टीम इंडियाने या विजयासह वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताने हा सामना 70 धावांनी जिंकला. भारताने विजयासाठी 398 धावांच टार्गेट दिलं होतं. पण न्यूझीलंडची टीम 327 रन्सवर ऑलआऊट झाली. एकट्या मोहम्मद शमीने 7 विकेट घेतले. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या सेंच्युरीने भारताचा सेमीफायनलचा मार्ग सुकर केला. टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली फायनल पर्यंतचा यशस्वी प्रवास केलाय. रोहित शर्मासाठी हा अभिमानाचा क्षण असेल.
टीम इंडियाच्या विजयी सेलिब्रेशन दरम्यान रोहित शर्माची 12 वर्षापूर्वीची एक जुनी पोस्ट X वर व्हायरल होतेय. टीम इंडियाने 2011 साली वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. पण रोहित शर्मा त्या टीमचा भाग नव्हता. त्यावेळी रोहितने X म्हणजे जुन्या टि्वटरवर निराशा व्यक्त केली होती. “वर्ल्ड कप टीमचा भाग न बनता आल्यामुळे मी खरोखर निराश आहे. मला इथून पुढे जाण्याची गरज आहे. प्रामाणिकपणे मान्य करतो, माझ्यासाठी हा मोठा झटका आहे” असं रोहितने X वरील पोस्टमध्ये लिहिलं होतं.
कमेंट सेक्शनमध्ये युजर्सनी काय म्हटलय?
टीम इंडियाने न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माची ही जुनी पोस्ट आता व्हायरल होतेय. कमेंट सेक्शनमध्ये लोक रोहित शर्माची ही हिम्मत आणि त्याच्या दृढ संकल्पाबद्दल त्याचं कौतुक करतायत. मधल्याकाळात रोहितने एक मोठा टप्पा गाठलाय. ‘आधी निराशा आणि आता एका मोठ्या विजयाच्या दिशेने अग्रेसर’ असं एका युजरने लिहिलिय. ‘विजयाच्या दिशेने आणखी एक पाऊल’ असं दुसऱ्या युजरने म्हटलय. टीम इंडिया फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला भिडणार आहे. दुसऱ्या सेमीफायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 3 विकेटने विजय मिळवला.
टिप्पणी पोस्ट करा