Samudhra Shastra : पुरुषांनो, स्त्री शरीराच्या ‘या’ भागाला चुकूनही करू नका स्पर्श!

 


ब्युरो टीम : ज्योतिषशास्त्राचा एक भाग म्हणजे सामुद्रिक शास्त्र. सामुद्रिक शास्त्रामध्ये व्यक्तीच्या शरीराच्या आणि अवयवांच्या रचनेच्या आधारे त्याचा स्वभाव व भविष्य जाणून घेता येतं. सामुद्रिक शास्त्रामध्ये व्यक्तीच्या शरीराच्या आणि अवयवांना फार महत्त्व आहे. त्याआधारेही एखाद्या व्यक्तीचं भविष्य सांगणे शक्य आहे, अशी मान्यता आहे.

सामुद्रिक शास्त्रानुसार स्त्रियांच्या अंगाचा एक असा भाग आहे, ज्याला पुरुषांनी पाहणे किंवा स्पर्श करणे टाळले पाहिजे. अन्यथा संबंधित पुरुषांना विविध समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. 

कोणता आहे तो भाग?

सामुद्रिक शास्त्रानुसार पुरुषांनी चुकूनही स्त्रीच्या नाभीला हात लावू नये. धार्मिक मान्यता आहे की, स्त्रीच्या नाभीत देवी कालीची शक्ती असते. त्यामुळे नाभीला स्पर्श केला तर देवी काली रागावते, व त्याचे परिणाम संबंधित व्यक्तीला भोगावे लागतात. खरतर स्त्री शरीराच्या प्रत्येक भागाची शुद्धता शास्त्रांमध्ये वर्णन केलेली आहे. पण स्त्रियांच्या अंगामधील नाभी हा असा भाग आहे, ज्यांना पुरुषांनी स्पर्श करू नये किंवा त्यापासून दूर राहणे गरजेचं आहे. असं म्हणतात की स्त्रीचा हा भाग पाहिल्यास गरिबीसोबत विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

दरम्यान, ज्योतिषशास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये असलेल्या ग्रहांचे विश्लेषण केल्यानंतरत्याचे भविष्य आणि व्यक्तिमत्व सांगितलं जातं. त्याचप्रमाणे सामुद्रिक शास्त्रामध्ये व्यक्तीच्या शरीराच्या आणि अवयवांच्या रचनेच्या आधारे भविष्य सांगण्यात येते. अर्थात त्यावर कितीपत विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने