Sidhhivinayak Nyass : सिद्धिविनायक न्यास मंदिर अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती; आदेश बांदेकरांना हटवले

 

ब्युरो टीम  : सिद्धिविनायक न्यास मंदिर अध्यक्षपदी नव्या चेहऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे गटाते नेते सदा सरवणकर यांच्यावर आता अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या आधी ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर हे सिद्धिविनायक न्यास मंदिराचे अध्यक्ष होते. त्यांचा कार्यकाळ 23 जुलै 2023 ला संपला. तीन वर्ष त्यांना ही जबाबदारी सांभाळली. ही जबाबदारी आता सदा सरवणकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांसाठी ते अध्यक्ष असतील. अध्यक्षपद मिळाल्यानंतर सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.

विकास कामांसाठी पंचवीस कोटींचा निधी

शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांनी सिद्धिविनायक न्यास मंदिर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे. न्यासाकडे सर्वांचंच लक्ष असतं त्या दृष्टीने मी आव्हाण पार पाडील असं सरवणकर म्हणाले. गणेश भक्तांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे, याशिवाय सुरक्षा आणि वाहतूक याकडे आमचं विशेष लक्ष असेल आणि यातील तृटी दूर करण्यासाठी मी लवकरच निर्णय घेईल असही ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने