ब्युरो टीम : 'सिंघम 3' या बहुचर्चित सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 2024 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या सिनेमातील अजय देवगनचा लूक आता आऊट झाला आहे. बाजीराव सिंघमच्या अंगावर शहारे आणणाऱ्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
'सिंघम 3' या सिनेमात अजय देवगन मुख्य भूमिकेत असून आता या सिनेमातील अभिनेत्याचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. अजय देवगनने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फर्स्ट लूकची झलक दाखवली आहे. त्यामुळे चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे
अजयने शेअर केलं 'सिंघम 3'चं पोस्टर
'सिंघम' फ्रेंचायजीच्या दोन्ही सिनेमांची प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. आता पुन्हा एकदा अजय देवगन चाहत्यांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहे. अजयने सोशल मीडियावर 'सिंघम 3' या सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर केलं आहे. 'सिंघम 3'च्या पोस्टरमध्ये अजयच्या सिंघम अवतार पाहायला मिळत आहे. पोस्टरमध्ये अजयसह सिंहाची झलकही पाहायला मिळत आहे. पोस्टर शेअर करत अजयने लिहिलं आहे,"तो पराक्रमी आहे, त्याच्याकडे शक्ती आहे, तो खतरा आहे, तो ताकद आहे..सिंघम पुन्हा येतोय".
'सिंघम 3' सिनेमातील अजय देवगनचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. चाहते कमेंट्स करत सिनेमासाठी उत्सुक असल्याचं अभिनेत्याला सांगत आहेत. अजय सर कमाल, आता फक्त सिनेमाची प्रतीक्षा, बाजीराव सिंघम पुन्हा येतोय, अजय सर भारी लूक, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
'सिंघम 3' कधी प्रदर्शित होणार?
'सिंघम 3' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रोहित शेट्टीने सांभाळली आहे. अजय देवगनसह या सिनेमात करीना कपूर (Kareena Kapoor) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच दीपिका पादुकोण आणि टायगर श्रॉफही या सिनेमात महत्तवाच्या भूमिकेत झळकतील. 'सिंघम 3' हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची आणि अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2) या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा