Skin Health : तेल एक फायदे अनेक, ‘हे’ तेल खाल्यानं त्वचा होईल निरोगी

 


ब्युरो टीम : स्वयंपाकघरात लागणारा अतिशय महत्त्वाचा पदार्थ म्हणजे तेल. निरोगी आरोग्यासाठी तेल कोणते वापरावे, असा प्रश्न अनेकांसमोर असतो. पण तुम्हाला आज आम्ही असे एक तेल सांगणार आहोत, जे तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण शेंगदाणा तेलाचा त्वचा निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयोग होतो.

व्हिटॅमिन ई त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करते. शेंगदाणा तेलामध्ये व्हिटॅमिन ई चे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हे तेल जर नियमित त्वचेवर लावले, तर अकाली वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यास मदत करते. चला तर, आज आपण शेंगदाणे तेलाचे त्वचेसाठी होणारे फायदे जाणून घेऊ.

मॉइश्चरायझेशन
शेंगदाणा तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि निरोगी मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. हे गुणधर्म या तेलाला उत्कृष्ट नैसर्गिक मॉइश्चरायझर बनवतात. हे तेल तुमच्या त्वचेवर लावल्यानं त्वचेचा कोरडेपणा टाळण्यास मदत होऊ शकते.

त्वचेचे पोषण
शेंगदाणा तेलामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम या सारखे त्वचेला आवश्यक असणारे पोषक घटक असतात,  जे निरोगी त्वचेसाठी खूप महत्त्वपूर्ण असतात. हे घटक तुमच्या त्वचेला आतून पोषण देतं, व त्वचेचा तेजस्वीपणा वाढवते.

अकाली वृद्धत्वापासून संरक्षण
शेंगदाणा तेलामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स, विशेषतः व्हिटॅमिन ई  अकाली वृद्धत्वास कारणीभूत असलेल्या मुक्त रॅडिकल्सचा सामना करण्यास मदत करू शकतात. या तेलाच्या नियमित वापरामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊ शकतात,  व तुमची त्वचा तरुण दिसते.

नैसर्गिक मेकअप रिमूव्हर
शेंगदाणा तेलाचा वापर नैसर्गिक मेकअप रिमूव्हर आणि क्लिन्झर म्हणून केला जाऊ शकतो. या तेलाचे गुणधर्म तुमची त्वचा जास्त कोरडे न करता चेहऱ्यावरील मेकअप काढण्यास मदत करतात.

दाहक विरोधी गुणधर्म
शेंगदाणा तेलामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. ते त्वचेचा लालसरपणा आणि खाज कमी करू शकते. एक्जिमा आणि सोरायसिस सारख्या त्वचा आजारांना दूर ठेवण्यासाठी त्वचेच्या काळजीमध्ये शेंगदाणा तेलाचा वापर केला जातो.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने