Team India Head Coach : BCCI च्या प्रशिक्षकपदासाठी 'या' दिग्गज खेळाडूंचा नकार;लगेच दुसऱ्या दिग्गज खेळाडूंची BCCI ने केली निवड

 

ब्युरो टीम : गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा होत होती. बीसीसीआय कोणाची निवड करणार याकडे क्रिकेट चाहत्यांंचंही लक्ष लागून होतं. आता चाहत्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.

BCCI ने हेड कोचबाबत मोठी घोषणा केली आहे. 'या' दिग्गज खेळाडूकडे जबाबदारी सोपवली

 क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली असून बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. वर्ल्ड कप फालनलनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाल संपला होता. त्यानंतर प्रशिक्षकपदासाठी कोणची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. बीसीसीआयने परत एकदा मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा राहुल द्रविडकडे दिली आहे. बीसीसीआयने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

बीसीसीआयने केलेलं ट्विट-:

बीसीसीआयने राहुल द्रविडसह सपोर्ट स्टाफचाही करार वाढवला आहे. बीसीसीआय आणि राहुल द्रविड यांच्याच चर्चा झाली त्यानंतर कार्यकाळ वाढवण्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. बीसीसीआयने आशिष नेहरा याला टी-२० साठी हेड कोच म्हणून ऑफर केल्याची बातमी आली होती. मात्र नेहराने नकार दिल्याची माहिती समजत आहे. आशिष नेहराच्या नकारानंतर राहुल द्रविड याला बीसीसीआयने कायम केलं आहे. येत्या टी-२० वर्ल्ड कपसाठी आता संघ बांधणी करावी लागणार आहे.  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने