ब्युरो टीम : 14 ते 18 वर्षे वयोगटातील मुले ही किशोरवयीन असतात. आणि याच काळात त्यांच्यात फक्त शारीरिक नव्हे तर मानसिकी आणि भावनिक बदलही होत असतात. त्यामुळे या काळात मुलांच्या मानसिक आरोग्याची आणि शारीरिक वाढीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सध्याच्या खराब आणि ढासळत्या जीवनशैलीत पालकांना अनेकदा त्यांच्या मुलांच्या विकासाबद्दल चिंता वाटत असते. किशोरवयीन मुलांमध्ये खाण्याच्या सवयीपासून ते व्यायामापर्यंत आरोग्यदायी सवयी लावणे खूप महत्त्वाचे आहे.
पौगंडावस्थेत मुलांच्या आहाराची योग्य काळजी घेतली नाही, तर शारीरिक वाढीसोबतच मानसिक वाढीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या काळात मुलांना जंक फूड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून दूर ठेवले पाहिजे. तसेच त्यांच्या आहारात आरोग्यदायी, पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. मुलांची योग्य वाढ होण्यासाठी त्यांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, ते समजून घेऊया.
डेअरी प्रॉडक्टस
देशी तूप, दूध, दही आणि लोणी यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचा मुलांच्या आहारात समावेश करणे आवश्यक आहे. किशोरवय हा शारीरिक वाढीचा काळ असतो. आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आढळतात ज्यामुळे दात आणि हाडे मजबूत होतात. त्यामुळे मुलांची उंचीही वाढण्यास मदत होते.
प्रोटीनयुक्त पदार्थही गरजेचे
पौगंडावस्थेत स्नायूंना बळकट करण्यासाठी की अंडी, बीन्स, टोफू, चिकन, सोयाबीन, कडधान्ये, सुका मेवा इत्यादी प्रथिनयुक्त पदार्थांचा मुलांच्या आहारात समावेश करावा. यामुळे मेटाबॉलिज्मटा रेट वाढतो. तसेच प्रथिनेयुक्त आहारामुळे मेंदूचा विकास होण्यास मदत होते. यामुळे शारीरिक व मानसिक बदल होत असताना मूल शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या मजबूत राहू शकते.
व्हिटॅमिन आणि मिनरलयुक्त पदार्थ
किशोरवयीन मुलांनी संतुलित आहार घेणे खूप महत्वाचे आहे. जीवनसत्त्वे असलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. आणि वाढत्या वयात मुलांचे रोगांपासून संरक्षण होते, ज्यामुळे त्यांची वाढ चांगली राहते. या वयात मायक्रो कंपाऊंड झिंक व्यतिरिक्त शरीराला मॅग्नेशिअम, आयोडीन, लोह आणि कॅल्शिअमचीही गरज असते. हे सर्व पोषक घटक आहारातून मिळू शकतात. यासाठी आहारात भरपूर फळे, बिया आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.
कार्बोहायड्रेट्समुळे मिळते एनर्जी
वाढत्या वयातील मुलांच्या आहारात कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थांचा भरपूर समावेश करावा. यासाठी आहारात बाजरी, ज्वारी, नाचणी यासारख्या संपूर्ण धान्याचा समावेश करावा. तसेच बटाटा, रताळं यासारख्या स्टार्चयुक्त पदार्थांचाही आहारात समावेश असावा.
टिप्पणी पोस्ट करा