ब्युरो टीम: हिंदू धर्मात लग्न हा खूप पवित्र आणि आनंदाचा सोहळा मनाला जातो. त्यामुळे साहजिकच लग्नासाठी विशेष मुहूर्त पाहिले जातात आणि त्याच मुहूर्तांना लग्न लावले जाते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? आपल्या कडे लग्नाच्या मुहूर्तांना सुरुवात तुळशीच्या लग्नापासून केली जाते. पंचांगानुसार, दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीनंतर तुळशी विवाहाचे आयोजन केले जाते. या दिवशी मोठ्या थाटामाटात तुळशी विवाहाचे आयोजन केले जाते. यादिवशी तुळशीशी शालिग्रामचा विवाह करण्याची परंपरा आहे. जो भक्त तुळशीविवाहाचा विधी करतो, त्याला कन्यादानाचे पुण्य मिळते, असे मानले जाते. तुळशीच्या लग्नापासून हिंदू धर्मात लग्न आणि इतर शुभ कार्याला सुरुवात होते. चला तर मग जाणून घेऊया या वर्षी तुळशीविवाह कधी आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे.
कधी केलं जातं तुळशीचं लग्न?
दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीनंतर तुळशी विवाह हा साजरा केला जातो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार यावेळी एकादशी 23 नोव्हेंबरला आणि दुसऱ्या दिवशी 24 नोव्हेंबरला द्वादशी तिथी आहे. हे दोन दिवस तुळशी विवाहासाठी मुहूर्त आहेत.
हे आहेत तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त
पंचांगानुसार द्वादशी तिथी गुरुवार, 23 नोव्हेंबर रोजी रात्री 9.01 वाजता सुरू होईल. शुक्रवार, 24 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:06 वाजता संपेल. अशा स्थितीत उदयतिथीचा विचार करून तुळशीविवाह 24 नोव्हेंबरलाच साजरा केला जाणार आहे. या शुभ संयोगात आपल्या घरात तुळशी-शाळीग्रामचे लग्न लावता येईल.
टिप्पणी पोस्ट करा