World Cup 2023 : भारतासोबत सेमी फायनल मध्ये लढणार हा संघ; असा आहे आकड्यांचा खेळ

 

ब्युरो टीम : वर्ल्डकप २०२३ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये जाणाऱ्या सुरुवातीच्या ३ संघांची नावं समोर आली आहेत. भारतीय संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला.

तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत करत ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलचं तिकीट मिळवलं आहे.

दरम्यान चौथ्या स्थानासाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या ३ संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. दरम्यान या ३ संघांसाठी कसं असेल सेमीफायनलमध्ये जाण्याचं समीकरण? समजून घ्या.

पहिलं समीकरण..

गुरुवारी (९ नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यात विजय मिळवताच न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रबळ दावेदार ठरेल. कारण न्यूझीलंडचा नेट रन रेट (+०.३९८) हा पाकिस्तान (+०.०३६) आणि अफगाणिस्तानपेक्षा (-०.३३८) चांगला आहे.

अफगाणिस्तानचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. हा सामना अफगाणिस्तानसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.या सामन्यात अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने जिंकावं लागणार आहे. कारण अफगाणिस्तानचा नेट रन रेट निगेटिव्ह आहे.

पाकिस्तानचा संघ आपला शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात किती धावांनी विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानला सेमीफायनलचं तिकीट मिळेल हे चित्र स्पष्ट असेल. पण जर न्यूझीलंडने आपला शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकला तर पाकिस्तानचं सेमीफायनलमध्ये पोहोचणं कठीण आहे.

जर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ पराभूत झाला आणि अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला तर समीकरण आणखी रोचक बनेल. इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकून पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये जाऊ शकतो.

कारण या विजयासह पाकिस्तानचा संघ १० गुणांवर पोहोचेल. पाकिस्तानचा नेट रन रेट हा अफगाणिस्तानपेक्षा चांगला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना भारत- पाकिस्तान यांच्यात सेमीफायनलचा सामना पाहायला मिळू शकतो. 

जर न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे तीनही संघ आपल्या शेवटच्या सामन्यात पराभूत झाले तर समीकरण आणखी रोचक बनेल. कारण तीनही संघांचे सध्या ८-८ गुण आहेत. असे झाल्यास नेट रन रेटच्या आधारे सेमी फायनलमध्ये जाणारा चौथा संघ कोण हे ठरवलं जाईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने