World Cup: भारताने विश्वचषक जिंकला असता तर कसं स्वागत झालं असतं; तिकडे ऑस्टेलियात पहा काय घडलं..

 

ब्युरो टीम : विश्वचषक २०२३ चे विजेतेपद पटकावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ आपल्या देशात परतला आहे. कमिन्सच्या नेतृत्वाखाली संघाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा 6 विकेट्स राखून सहज पराभव केला. भारतातील चाहते पराभवाने निराश झालेले असताना ऑस्ट्रेलियात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. संघ विजयी होऊन पोहोचला पण चॅम्पियन संघाच्या स्वागताला कोणीच आले नाही.

स्वागतासाठी एकही चाहता नाही

पॅट कमिन्सचा विमानतळावरून बाहेर पडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये केवळ 4-5 फोटोग्राफर दिसत आहेत. स्वागतासाठी आलेला एकही चाहता दिसत नाहीये. त्याची बॅग घेऊन जाण्यासाठीही कोणी नव्हते. ट्रॉलीवर ठेवल्यानंतर तो स्वत: बॅग घेत आहे. इतर खेळाडूंचेही फोटो समोर येत आहेत, ज्यात ते स्वत: त्यांचे सामान घेऊन जात आहे आणि आजूबाजूला कोणीही नाही.

सोशल मीडियावर अशा उमटल्या प्रतिक्रिया

वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचे कोणाकडूनच स्वागत न झाल्याने याबाबत सोशल मीडियावर ही प्रतिक्रिया उमटत आहेत. एका यूजरने लिहिले की, क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलियात प्रसारित झाला नाही असे दिसते. एकाने लिहिले – पॅट कमिन्स विश्वचषक जिंकून ऑस्ट्रेलियाला पोहोचला, जेसीबीचे उत्खनन पाहण्यासाठी जेवढे लोक येतात तेवढेही विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी आले आले नाहीत. एकाने लिहिले – यापेक्षा जास्त लोक आमच्या ऑफिसच्या मजल्यावर आढळतात.

भारतीय संघाचा फायनलमध्ये पराभव

भारतीय संघाने सलग १० सामने जिंकत भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात अपेक्षा वाढवली होती. पण ही विजयाची घौडदौड ते कायम ठेवू शकले नाहीत. भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आणि करोडो लोकांचे हृदय तुटले. भारतीय संघाच्या तरीही लोकं पाठिशी उभे राहिले.

ऑस्ट्रेलियात मात्र कोणीही त्यांचे साधे स्वागत ही केले नाही. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ६ वर्ल्डकप जिंकले आहेत. भारता सारख्या संघाचा पराभव करुन टीमने वर्ल्डकप जिंकला. पण त्याची दखल ही कोणी घेतली नाही. ऑस्ट्रेलियाकडून हेडने शतकीय खेळी करत भारताच्या स्वप्नावर पाणी फेरले. फायनल सामन्यात भारतीय संघाने २४० रन केले होते. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २४१ धावाचे लक्ष्य होते. जे हेडने सहज मिळवून दिले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने