Ajit Pawar: माझ्या एवढे कामा करून दाखवा ...अजित पवारांचे ओपन चॅलेंज ......

 

ब्युरो टीम : आपण सरकारमध्ये गेलो त्यामुळे अनेक प्रश्न सुटले आहेत. मी जेवढं काम करतो आहे तेवढं दुसरे कुणी मायका लाल करू शकत नाही. आपले चॅलेंज आहे असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. कोणत्याही कामाचे घ्या असेही अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते नूतन सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार झाला. त्यानंतर आयोजीत केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत सध्या धरणांमध्ये 20 टक्क्यांनी पाणीसाठी कमी आहे. त्यामुळं पहिलं पाणी प्यायला, दुसरे शेतीला आणि तिसरे उद्योगाला पाणी. आधी दुसऱ्यांदा उद्योगाला पाणी  देण्याचा निर्णय होता. पण तो निर्णय आम्ही बदलला आणि शेतीला प्राधान्य दिल्याचे अजित पवार म्हणाले.

दिलेल्या संधीचं सोनं करा

दिलेल्या संधीचे सोनं करा.  लग्न पत्रिकेत फक्त प्रेषक म्हणून पदाचे नाव टाकायला उपयोग करू नका असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. मलाही साखर कारखान्याचे काहीही कळत नव्हतं. पण अभ्यास केला आणि समजून घेतल्याचे अजित पवार म्हणाले. सगळ्या जाती धर्माच्या लोकांसोबत काम करा. 

आपण बदल्या करायला मंत्री झालो नाही

मी पावणेसहाला बाहेर पडलो तेव्हा गेटवर एकाने पत्र दिले दादा, त्यावेळी अनेक आमदार झोपले असतील. काय काय जण तीनवेळा कागद देतात असे अजित पवार म्हणाले. आपण बदल्या करायला मंत्री झालो नाही. हा बदल्यांचा काळ नाही. मार्च एप्रिल महिन्यात बदल्या होतात. आता बदलीसाठी अर्ज केला तर ती फाईल मुख्यमंत्री यांच्याकडे जाते असे अजित पवार म्हणाले. 

पुढे मुलाचे नाव लिहताना आईचे नाव लिहावं लागणार

मंत्री अदिती तटकरे यांनी चौथे महिला धोरण आणले, ते आम्ही मान्य केलं. फार बारकाईने हे महिला धोरण राबवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आधी पुढे मुलाचे नाव वडिलांचे नाव आणि आडनाव असे लागायचे. आता मुलाचे, आईचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव असे लावावे लागणार असल्याचे अजित पवार म्हणाले. महिला हा देखील समाजाचा महत्वाच घटक आहे. महिलांच्या नावावर घर घेतले  1 टक्के व्याज कमी लागते असे अजित पवार म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पहिल्या, राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी

ग्रामपंचायत निवडणुकीत झाली त्याचा कौल कसा लागला हे आपण पाहिले आहे. यामध्ये भाजप पहिल्या, राष्ट्रवादी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर पक्ष राहिला आहे. बाकीचे पक्ष त्याच्या मागे राहिले आहेत. 

दरम्यान, आमची सगळ्यांना मदत राहील असे अजित पवार म्हणाले. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने