ब्युरो टीम : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीची पहिली झलक दाखवली. राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोनल कोल्हे यांना थेट चॅलेंज दिलं. अमोल कोल्हे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देणार अन् तो निवडून आणणार असं अजित पवार म्हणाले. यानंतर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज भेट घेतली. या भेटीनंतर अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा अमोल कोल्हे यांनी अजितदादांना आवाहन केलं आहे. अजितदादांना टोलाही लगावला आहे.
अमोल कोल्हे यांचं आवाहन काय?
अजितदादांचा एवढा दरारा आहे. त्यांनी केंद्र सरकारला बोलावं आणि कांदा निर्यात बंदी उठवावी. त्यांच्याकडे अर्थखातं आहे. तर त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा. तत्वांबरोबर राहणं योग्य आहे. त्या पक्षासोबत मी आहे. मी कुठे गेलो आहे? येणाऱ्या भविष्य काळात गणित दिसेल. आमदार कोण-कोणत्या कारणामुळे भूमिकेत आहेर हा एक चर्चेचा विषय आहे. माझा ना कारखाना आहे ना कंपन्या आहेत. ना माझ्यावर चौकशी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जनता ठरवेल, कुणाला निवडून द्यायचं ते, असं अमोल कोल्हे म्हणालेत.
अजितदादांना टोला
अजितदादांनी काल एका चित्रपटाचा उल्लेख केला.मात्र एका चित्रपटातील संवाद आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांना दक्खनची सुभेदारी द्यावी, असं दिल्लीपतींच्या मनात होतं. दख्खनची सुभेदारी ही स्वराज्याच्या कैक पट होती. मात्र तेव्हा सुभेदारी स्वीकारली नाही. तत्वांशी तडजोड केली नाही. म्हणून तर आज ताठ मानेन जगतोय, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांनी टोला लगावला आहे.
शेतकरी प्रश्नावर अमोल कोल्हे आक्रमक
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही रस्त्यावर उतरत आहोत. सहा मुद्दे घेवून आपण यात्रा करत आहोत. कांदा बंदी उठवावी. दिवसा वीज द्यावी. विमा कंपन्याचं धोरण निश्चित करावं. दुधाचे दर पडले आहेत. 26 लाख लिटर दुधाचं कलेक्शन आहे.शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी,यासाठी आम्ही यात्रा काढत आहोत.या यात्रेसाठी शरद पवार यांचं मार्गदर्शन घेतलं आहे. पवारसाहेब देशाचे कृषीमंत्री होते तेव्हा कांद्यावर बंदी आणवी, अशी भाजपची भूमिका होती मात्र पवारांनी ठाम भूमिका घेतली आहे. आता शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने निर्णय घ्यावेत यासाठी आम्ही यात्रा काढतोय, असं अमोल कोल्हे म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा