ब्युरो टीम : अभिनेता सलमान खान याचा भाऊ अरबाज खान सध्या त्याच्या दुसऱ्या लग्नमुळे चर्चेत आला आहे. अभिनेता गर्लफ्रेंड शौरा खान हिच्यासोबत लग्न करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. आजच्या 24 डिंसेबरच्या मुहूर्तावर अरबाज गर्लफ्रेंडसोबत दुसरं लग्न करणार असल्याची माहिती समोर आली. आता रंगणाऱ्या सर्व चर्चांवर खु्द्द अरबाज खान याने प्रतिक्रिया दिली आहे. नुकताच अरबाज एका कार्यक्रमात पोहोचाला होता. तेव्हा पापाराझींनी अभिनेत्याला लग्नासाठी कुठे यायचं असा प्रश्न विचारला. सध्या अरबाज याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये अरबाज रेड कार्पेटवर पापाराझींना पोज देताना दिसत आहे. तेव्हा पापाराझींनी अभिनेत्याला लग्नाबद्दल विचारलं. यावर एक शब्द देखील बोलता अभिनेत्याने ‘ॲनिमल’ सिनेमातील अभिनेता बॉबी देओल याची पोज दिला. शिवाय ब्लश करत अभिनेत्याने पापाराझींना शांत राहण्यासाठी सांगितलं
सांगायचं झालं तर, नुकताच मुंबई याठिकाणी उमंग 2023 कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. कार्यक्रमात अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. कार्यक्रमात दीपिका पादुकोण, शाहरुख खान, सलमान खान, कार्तिक आर्यन, कियारा आडवाणी, रणबीर कपूर, आलिया भट्ट, बॉबी देओल, रणवीर सिंग, शिल्पा शेट्टी, रवीना टंडन, शहनाज गिल यांसारखे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होतं. पण सर्वांच्या नजरा अरबाज याच्यावर येऊन थांबल्या…
मीडिया रिपोर्टनुसार, शौरा खान आणि अरबाज खान यांची ओळख आगामी ‘पटना शुक्ला’ सिनेमाच्या सेटवर झाली. पहिल्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झाल्याची चर्चा देखील जोर धरु लागली आहे. सांगायचं झालं तर, यावर अद्याप शौरा खान आणि अरबाज खान अधिकृत घोषणा केलेली नाही.
शौरा खानपूर्वी अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघेही बराच काळ सोबत होते पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर जॉर्जिया हिने भावना देखील व्यक्त केल्या. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.
अरबाज खान आणि मलायका अरोरा
अरबाज खान याचं पहिलं लग्न अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासोबत झालं होतं. दोघांना एक मुलगा दोखील आहे. लग्नाच्या 19 वर्षांनंतर अरबाज आणि मलायका यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे.
टिप्पणी पोस्ट करा