ब्युरो टीम : आज सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांना दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी सारथी बार्टी आणि महाज्योती या संस्थेकडे फेलोशिप संबंधित अर्ज केलेल्या संशोधक विद्यार्थीची CET परिक्षा घेण्यात आली. सदर परिक्षेच्या आयोजनाची जबाबदारी ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडे देण्यात आली होती.
सेट विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे २३ जून २०१९ रोजी सेट परीक्षाचा जो पेपर झाला होता तोच पेपर आहे तशाच स्वरूपात आता देण्यात आला आहे. हि अतिशय गंभीर अशी चूक असून ही एक चूक हजारो संशोधक विद्यार्थीच्या शैक्षणिक नुकसानास जबाबदार ठरली आहे. व यामधून विद्यापीठ व प्रशासनाची प्रतिमा मलीन करण्याचे काम सेट विभागाच्या जबाबदार अधिकारी वर्गाने केलेली आहे. या सर्व गैरप्रकारामुळे एप्रिल मध्ये जी सेट परीक्षा होणार आहे. ती देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यामुळे सेट विभागाचे समन्वयक बाबासाहेब कापडणीस यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. अथवा विद्यापीठ प्रशासनाने त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी. तसेच यावर एक उच्च स्तरीय चौकशी समिती गठीत करण्यात यावी. असे न झाल्यास येत्या काही दिवसांत NSUI आणि इतर समविचारी संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही निवेदन देऊन इशारा दिला.
यावेळी कुलगुरू यांनी याच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले
यावेळी पुणे शहर व जिल्हा अध्यक्ष अभिजीत गोरे देशमुख, विध्यार्थी कृति समितीचे राहुल ससाणे ,कोथरुड विधानसभा NSUI अध्यक्ष आकाश माने, पर्वती विधानसभा अध्यक्ष ओम भवर,शकील शेख,रविराज कांबळे,तनुजा पंडित व इतर PHD विद्यार्थी तसेच NSUI चे तसेच डाप्साचे सागर सोनकांबळे, पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा