Cricket : दुसऱ्या टी 20 सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेचा टीम इंडियावर 5 विकेट्सने विजय

 

ब्युरो टीम : दक्षिण आफ्रिकाने क्रिकेट टीम इंडियावर दुसऱ्या टी 20 सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. सामन्यातील पहिल्या डावात टीम इंडियाच्या बॅटिंग दरम्यान पाऊस आल्याने दक्षिण आफ्रिकेला 15 ओव्हरमध्ये 154 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 13.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

दक्षिण आफ्रिकेकडून रिझा हेंड्रिक्स याने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. कॅप्टन एडन मारक्रम याने 30 धावा जोडल्या. डेव्हिड मिलर याने 17 आणि मॅथ्यू ब्रीट्जके याने 16 धावा केल्या. हेनरिच क्लासेन 7 धावा करुन आऊट झाला. तर ट्रिस्टन स्टब्स आणि एंडिले फेहलुकवायो याने जोडीने दक्षिण आफ्रिकेला विजयापर्यंत पोहचवलं. ट्रिस्टन स्टब्स आणि एंडिले फेहलुकवायो या दोघांनी अनुक्रमे नाबाद 14 आणि 10 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून मुकेश कुमार याला 2 विकेट्स मिळाल्या. तसेच मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

टीम इंडियाची बॅटिंग

दरम्यान त्याआधी टीम इंडियाने पावसाच्या एन्ट्री आधी 19.3 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 180 धावा केल्या. टीम इंडियाकडून रिंकू सिंह याने नॉट आऊट 68 रन्स केल्या. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने 56 धावांची खेळी केली. तिलक वर्मा याने 29 धावा जोडल्या. रवींद्र जडेजाने 19 धावांचं योगदान दिलं. जितेश शर्मा 1 रन करुन आऊट झाला. तर यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल आणि अर्शदीप सिंह या तिघांना भोपळाही फोडता आला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्झी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर मार्को जान्सेन, लिजाद विलियम्स, तबरेज शम्सी आणि कॅप्टन एडन मारक्रम या चौकडीने 1-1 विकेट घेतली.

दक्षिण आफ्रिकेचा विजय

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडेन मारक्रम (कॅप्टन), मॅथ्यू ब्रीट्जके, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जानसेन, एंडिले फेहलुकवायो, गेराल्ड कोएत्जी, लिजाद विलियम्स आणि तबरेज शम्सी.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने