Dr Sujay Vikhe Patil : अन् खासदारांनी गळ्यात स्टेथोस्कोप घालत सुरू केली आरोग्य तपासणी



ब्युरो टीम : माणूस राजकारणात आल्यानंतर आपला मूळ व्यवसाय विसरतो, असं अनेकदा म्हंटलं जातं. मात्र अहमदनगर येथील भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी एका आरोग्य शिबिराला भेट देताना गळ्यामध्ये थेट स्टेथोस्कोप घालतच तेथे उपस्थित असणाऱ्यांची तपासणी सुरू करत एक प्रकारे शिबिराला अनोख्या शुभेच्छा दिल्या. सध्या खासदार विखे पाटील यांचा आरोग्य तपासणी करतानाचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्याची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू आहे.

खासदार विखे पाटील हे न्यूरो सर्जन आहेत. ते राजकारणात खूपच सक्रिय असतात. यंदा तर प्रथमच निवडून आलेले मात्र लोकसभेच्या कामाकाजात हिरीरीने भाग घेणाऱ्या टॉप टेन खासदारांची यादीमध्येही डॉ. सुजय विखे पाटील यांचा समावेश झाला होता. तसेच ते आपल्या राजकीय वक्तव्यानेही सातत्याने चर्चेत असतात मात्र आता डॉ.सुजय विखे पाटील यांची एक कृती इतरांसमोर आदर्श निर्माण करणारी ठरली आहे. त्याचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

अहमदनगर येथे मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला खासदार विखे पाटलांनी भेट देत चक्क तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांची आरोग्य तपासणी केली. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून विखे पाटलांच्या या कृतीच राजकीय, सामाजिक वर्तुळात कौतुक होत आहे.

नेमकं काय घडलं?

मराठी पत्रकार परिषदेच्या अहमदनगर जिल्हा शाखेने यंदा परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिरासोबतच मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकारांना नंबरचे चष्मे तसेच गॉगलचे मोफत वाटप करण्यात आले. या शिबिराला खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांनी भेट देत मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच डॉ.सुजय विखे यांनी स्वतः

गळ्यात स्टेथोस्कोप घालत परिषदेचे सरचिटणीस मन्सूरभाई शेख यांच्यासह इतर पत्रकारांची आरोग्य तपासणी केली. सध्या याप्रकाराचे फोटो, व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात त्याची चर्चा सुरू आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने