ब्युरो टीम : अरबी समुद्रात भारताने वॉरशिपची तैनाती वाढवली आहे. एमवी केम प्लूटोवर ड्रोन हल्ला झाल्यानंतर भारताने अरबी समुद्रात तीन युद्धनौका तैनात केल्या आहेत. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात आयएनएस मोर्मुगाओ, आयएनएस कोच्ची आणि आयएनएस कोलकाताची तैनाती केली आहे. अगदी दूरवरपर्यंत लक्ष ठेवण्यासाठी टेहळणी विमान पी8आयला तैनात केलं आहे. शनिवारी पोरबंदरपासून जवळपास 217 समुद्री मैल अंतरावर एमवी केम प्लूटो जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आला. या जहाजात 21 भारतीय सदस्य होते. या घटनेनंतर भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाने लगेचच या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या भारतीय जहाजांच्या मदतीसाठी युद्धनौका तैनात केल्या.
एमवी केम प्लूटो जहाज मुंबई बंदरात पोहोचलय. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर या जहाजावर ड्रोन हल्ला झाला. हा हल्ला झाला, त्यावेळी किती प्रमाणात स्फोटकांचा वापर झाला? हे फॉरेन्सिक आणि टेक्निकल तपासातून समोर येईल.
हल्ल्यामागे कुठला देश?
एमवी केम प्लूटो जहाजावरील ड्रोन हल्ल्यामागे इराण असल्याचं अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटागॉनने म्हटलं आहे. मुंबईपर्यंतच्या प्रवासात एमवी केम प्लूटोला भारतीय तटरक्षक दलाच्या आयसीजीएस विक्रम जहाजाने सुरक्षा प्रदान केली.
भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने काय सांगितलं?
भारतीय नौदलाच्या स्फोटक विरोधी पथकाने हल्ल्याचा प्रकार आणि क्षमता समजून घेण्यासाठी प्राथमिक अभ्यास केला आहे असं भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितलं. हल्ला झालेल क्षेत्र आणि जहाजावरील ढिगाऱ्याच निरीक्षण केल्यानंतर हा ड्रोन हल्ला असल्याचे संकेत मिळत आहेत. आता फॉरेन्सिक आणि टेक्निकल विश्लेषणाची गरज आहे.
किती डिस्ट्रॉयर तैनात?
नौदलाच्या स्फोटक विरोधी पथकाने जहाजाची तपासणी केल्यानंतर विविध एजन्सीनी संयुक्त तपास सुरु केला. अरबी समुद्रात व्यापारी जहाजावरील वाढते हल्ले लक्षात घेऊन तीन डिस्ट्रॉयर तैनात केल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा