ब्युरो टीम : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या समोर सारथी , बार्टी आणि महाज्योती संस्थेकडे फेलोशिपसाठी अर्ज केलेल्या संशोधक विद्यार्थीची एकत्रित संवाद बैठक संपन्न झाली. या सर्व संस्थेमार्फत दिली जाणारी फेलोशिप सरसकट देण्यात यावी ही प्रमुख मागणी घेऊन संशोधक विद्यार्थी पुणे, मुंबई , कोल्हापूर , नागपूर , आणि औरंगाबाद इ. ठिकाणी गेल्या कित्येक दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. परंतु या आंदोलक विद्यार्थींच्या मागण्या समजून घेण्याऐवजी सरकार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्व संशोधक विद्यार्थ्यांची टिंगलटवाळी करण्याचें काम करत आहेत. ही अत्यंत निंदनीय बाब आहे. संशोधक विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. देशाच्या विकासामध्ये नवनवीन संशोधनाचा महत्त्वाचा वाटा असतो. आणि अशा विद्यार्थ्यांना फेलोशिप साठी संघर्ष करायला लागणे ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे.
आजच्या बैठकीत फेलोशिप संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी बैठकीस सारथी , बार्टी , महाज्योती आणि TRTI संस्थेकडे अर्ज केलेले संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. येणाऱ्या काळात स्वतंत्रपणे न लढता सर्व संस्थांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. व एकत्रित येऊन राज्य सरकारच्या विरोधात एक व्यापक जनआंदोलन उभा करण्याची गरज आहे हे लक्षात घेता तशा स्वरूपाचे आंदोलन उभा करण्याची चर्चा झाली. सर्वानुमते एक पीएचडी रिसर्च स्कॉलर असोसिएशन महाराष्ट्र राज्य या फ्रंटची स्थापना करण्यात आली. आम्ही सर्व संशोधक विद्यार्थ्यांना आवाहन करत आहोत की, आपला लढा अधिक व्यापक करण्यासाठी एकत्र यावे लागेल. आपल्याला वेगवेगळ्या गटात विभागून चालणार नाही.
आजच्या बैठकीस सारथी संस्थेच्या वतीने तुकाराम जाधव , अर्जुन साळुंखे, तुकाराम शिंदे तसेच बार्टी संस्थेच्या वतीने कैलास गायकवाड, प्रविण गायकवाड, दिपक वसके उपस्थीत होते, अक्षय सुर्यवंशी हे महाज्योती संस्थेच्या वतीने उपस्थीत होते तसेच सोमनाथ निर्मळ SFI
या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी विविध राजकीय पक्ष व संघटनांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रवक्ते हनुमंत पवार, इंटकचे पुणे शहर अध्यक्ष बळीराम डोळे , NSUI च्या वतीने अक्षय कांबळे, आदीनाथ जावीर , सिद्धांत जांभुळकर, रवीराज कांबळे, महेश कांबळे , डाप्सा च्या वतीने सागर सोनकांबळे इ. उपस्थित होते. या संवाद बैठकीचे आयोजन अक्षय कांबळे व इतर समविचारी संघटना यांनी एकत्रितपणे केले होते.
-----
सारथी बार्टी आणि महाज्योती संस्थेकडून सरसकट फेलोशिप मिळाली पाहिजे यासाठीचा चालू असलेला लढा अधिक व्यापक आणि तीव्र करण्यासाठी कालच्या संवाद बैठकीत पीएचडी रिसर्च स्कॉलर असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संयुक्त फ्रंटचे गठन करण्यात आले आहे. या फ्रंटच्या वतीने आम्ही महाराष्ट्रातील सर्व संशोधक विद्यार्थीना एकत्रित करून लवकरच एक मोठा लढा उभारणार आहोत.
- राहूल ससाणे ( पीएचडी संशोधक विद्यार्थी , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , पुणे )
टिप्पणी पोस्ट करा