Fire : धर्माधिकारी मळा येथील सुमन अपार्टमेंटला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग, माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ

 

विक्रम बनकर (नगर) : धर्माधिकारी मळा येथील सुमन अपार्टमेंटला अचानक शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली, यामुळे येथील रहिवासी भयभीत झाले होते. घटनेची माहिती मिळताच  माजी उपमहापौर अनिल बोरुडे तात्काळ घटनास्थळी दाखल होत मनपाच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधत पाचारण केले अग्निशमन दल व नागरिकांच्या सहकार्याने या भीषण आगीवर नियंत्रण मिळवले. इमारतीचे मोठं नुकसान या आगीत झाले आहे या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेत येथील एक रहिवासी महिला जखमी झाली असून त्यांना माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करत त्या महिलेला तब्येतीची विचारपूस केली, माजी उपमहापौर अनिल बोरुडे हे नागरिकांच्या मदतीसाठी सदैव झटत असल्याने आपल्या हक्काचा माणूस असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. यावेळी पुष्कर कुलकर्णी व परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासासाठी मदत केली

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने