ब्युरो टीम : मराठी पत्रकार परिषदेचा येत्या ३ डिसेंबरला ८५ वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांच्या सूचनेनुसार मराठी पत्रकार परिषद अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पञकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
रविवारी (३ डिसेंबर) सकाळी दहा वाजता या शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते व मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस मन्सूर शेख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत पत्रकारांची आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी पत्रकारांना मोफत चष्मा व गॉगलचे वाटपही केले जाणार आहे. हे शिबिर मराठी पत्रकार परिषद कार्यालय, झेंडिगेट, अहमदनगर येथे होणार आहे. तरी सर्व पत्रकारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, अहमदनगर जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा