Helath : कमरेभोवती चरबी वाढलीय ; 'या' व्यायामाने होईल चरबी कमी

 

ब्युरो टीम : सध्याची बदलती जीवनशैली, फास्टफूड मोठ्या प्रमाणात खाणे, एका जागी बसून जास्तवेळ काम करणे अशा अनेक गोष्टींमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण होताना दिसत आहे. त्यात बहुतेक लोक व्यायाम करायचाही कंटाळा करतात. त्यामुळे त्यांच्या शरीरातील चरबी वाढते आणि लठ्ठपणा निर्माण होतो. तर लठ्ठपणामुळे लोकांना अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.

लठ्ठपणा हा सगळ्यात आधी कंबरेपासून सुरू होतो. आपल्या शरीरात कंबर आणि पोटाभोवती चरबी जमा होत असते. त्यामुळे लोक पोट कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रणात आणण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करत असतात. तर आता आपण कंबरेभोवती जमा झालेल्या चरबीपासून सुटका मिळवण्यासाठी काही सोप्या व्यायामाबाबत जाणून घेणार आहोत.

पायऱ्या चढण-उतरणे – कंबरेभोवती जमा झालेली चरबी कमी करायची असेल तर पायऱ्यांचा वापर करून तुम्ही ती कमी करू शकता. यासाठी कधीही ऑफिसला जाताना, घरी जाताना लिफ्टता वापर करू नका, नेहमी पायऱ्यांवरून जा. पायऱ्या चढल्यामुळे आणि उतरल्यामुळे आपल्या शरीराचा व्यायाम होतो आणि कंबरेभावतीची, पोटाभोवतीची चरबी कमी होण्यास मदत होते.

सिट-अप्स – सिट-अप्स हा व्यायाम वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. तुम्ही सिट-अप्स करून तुमच्या कंबरेभोवती जमा झालेली चरबी कमी करू शकता. या व्यायामुळे पोट कमी होण्यास मदत होते तसंच पाठीचा भागही मजबूत होतो.

प्लैंक – प्लैंक हा व्यायाम केल्यामुळे कंबरेभोवतीची चरबी कमी होण्यास मदत होते. चरबी कमी करण्यासाठी हा सर्वात प्रभावी व्यायाम आहे. हा व्यायाम केल्यामुळे शरीरातील चरबी कमी तर होतेच सोबत तुमच्या शरीरातील सर्व भाग मजबूत होतात.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने