ब्युरो टीम : इंडियन प्रीमयर लीग अर्थात आयपीएलच्या (IPL 2024) येत्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया पार पडत आहे. आयपीएलच्या 2008 पासून ते आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक रक्कम ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्सला मिळाली आहे. सनरायजर्स हैदराबादने कमिन्सला तब्बल 20.50 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतलं. कमिन्सची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती. आयपीएलच्या इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे क्रिकेट विश्वचषकात सर्वांचं लक्ष वेधून घेणारा न्यूझीलंडचा डॅशिंग सलामीवीर रचिन रवींद्रला अपेक्षित किंमत मिळाली नाही. रचिन रवींद्रला चेन्नई सुपर किंग्जने अवघ्या 1.80 कोटी रुपयात संघात सामावून घेतलं.
आयपीएलमध्ये कोण महाग, कोण स्वस्त?
खेळाडू किंमत संघ
पॅट कमिन्स 20.50 कोटी सनरायजर्स हैदराबाद (SRH)
हर्षल पटेल 11.75 कोटी पंजाब किंग्ज
गेराल्ड कोएत्जी 5 कोटी मुंबई इंडियन्स
अजमतुल्लाह ओमरजई 50 लाख गुजरात टायटन्स
शार्दूल ठाकूर 4 कोटी चेन्नई सुपर किंग्ज
डॅरी मिचेल 14 कोटी चेन्नई सुपर किंग्ज
ख्रिस वोक्स 4.2 कोटी पंजाब किंग्ज
रचिन रवींद्र 1.80 कोटी चेन्नई सुपर किंग्ज
हसरंगा 1.5 कोटी सनरायजर्स हैदराबाद
ट्रॅविस हेड 6.8 कोटी सनरायजर्स हैदराबाद
हॅरी ब्रूक 4 कोटी दिल्ली कॅपिटल
रोवमॅन पॉवेल 7.4 कोटी राजस्थान रॉयल्स
टिप्पणी पोस्ट करा