ब्युरो टीम :टीम इंडिया दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तिसऱ्या आणि टी 20 सामन्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाचा तिसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याआधी क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियामधील एका खेळाडूला गूड न्यूज मिळाली आहे. टीम इंडियाच्या युवा आणि मुंबईकर खेळाडूकडे पुन्हा एकदा कर्णधारपदाची सूत्र देण्यात आली आहेत. सोशल मीडियावरुन टीम मॅनेजमेंटने याबाबतची माहिती दिली आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठी येत्या मंगळवारी 19 डिसेंबर रोजी ऑक्शन पार पडणार आहे. त्याआधी अभिनेता शाहरुख खान याच्या मालिकीच्या केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यर याची कर्णधारपदी फेरनियुक्ती केली आहे. श्रेयसला कर्णधार केल्याने 16 व्या मोसमात केकेआरचं नेतृत्व करणाऱ्या नितीश राणा याचं डिमोशन झालं आहे. नितीश राणा याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. केकेआर टीम मॅनेजमेंटने एक्स अकाउंटवरुन याबाबत क्रिकेट चाहत्यांना कळवलं आहे.
श्रेयस अय्यर याला आयपीएल 16 व्या मोसमातून पाठीच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे नितीश राणा याच्याकडे कर्णधारपदाची सूत्र देण्यात आली. मात्र श्रेयस गेल्या अनेक महिन्यांआधी या दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचं कॅप्टन्सी करताना दिसणार आहे.
श्रेयस मुख्य तर नितीश उप
श्रेयस अय्यरची पहिली प्रतिक्रिया
श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा केकेआरच्या कर्णधारपदी नियुक्ती होताच पहिली प्रतिक्रिया देत नितीश राणा यांचं कौतुक केलं आहे. आयपीएल 16 वा मोसम आमच्यासाठी आव्हानात्मक होता.नितीशने चांगल्या पद्धतीने जबाबदारी सांभाळली. नितीशने माझ्या जागी उत्तम कामगिरी करत कर्णधारपदाचीही जबाबदारी सांभाळली. नितीशला उपकर्णधार केल्याने मी आनंदी आहे. नितीशमुळे टीमची ताकद वाढेल यात अजिबात शंका नाही”, असं श्रेयस अय्यर म्हणाला.
केकेआरची 16 व्या मोसमातील कामगिरी
दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स 16 व्या मोसमात पॉइंट्समध्ये सातव्या स्थानी राहिली. नितीशने आपल्या नेतृत्वात केकेआरला 14 पैकी 4 सामन्यात विजय मिळवून दिला. तर पराभूत झालेल्या सामन्यातही नितीशने प्रतिस्पर्धी संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला नाही.
टिप्पणी पोस्ट करा