ब्युरो टीम : मुंबईतील आंदोलनाबाबत उद्या पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देऊ असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. मागास आयोगाने फक्त मराठा समाजाच नाही, इतर समाजाच सुद्धा मागसलेपण तपासणार असं म्हटलय. त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मागास आहेत की नाही हे तपासण गरजेच आहे. हे माझ व्यक्तीगत मत आहे” “सरकारने ठरवलय ते सरकारच्या हातात आहे. सरकारच्या डोक्यात, मनात जे आहे, ते करतय. मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण मिळवून देण्यासाठी आमची लढाई आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मराठा आणि कुणबी एकच असल्याचे हजारो पुरावे आहेत. मराठा आणि कुणबी एकच असल्याच सिद्ध झालय, तर कशाला विनाकारण फुफाटयात ढकलताय” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“मराठा समाजाला टिकणार आरक्षण मिळाल पाहिजे. 50 टक्क्यांच्या वर गेलं की आरक्षण उडतं” असं जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे यांची भूमिका धरसोडपणाची आहे, त्यांना मुंबईला येण्याची गरज नाही, असं विखे पाटील म्हणाले. “उगाच मागे बोलू नका. धरसोडपणा तुम्ही केला. सगळ्या महाराष्ट्रात सॉफ्टवेअर का नाही दिले? त्यामुळे मोडी लिपीद्वारे नोंदी तपासता आल्या असत्या” असं उत्तर जरांगे पाटील यांनी दिलं. “20 तारखेच्या आत आरक्षणाचा प्रश्न मार्गी निघाला, तर मुंबईत जाण्याची गरजच उरणार नाही. आमच्या पोरांच वाटोळ होईल म्हणून आम्ही आरक्षणावर ठाम आहोत” असं जरांगे पाटील म्हणाले.
‘आपल्या पश्चात लेकरांचे हाल होतील’
“मुंबईत चाललोय. आता गोळ्या घातल्या तरी आरक्षणाशिवाय माघार नाही. मी माझ्या समाजासाठी ताकत, जीव पणाला लावायला तयार आहे. पोरांची संधी गेली, तर हाल होतील. म्हणून मराठा समजाला आवाहन आहे की, त्यांनी आपण आहोत तो पर्यंत आरक्षण मिळवून देऊ, नंतर हाल होतील आताच सावध व्हा. नाईलाज आहे. मराठ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की, घरी बसू नका. आपल्या पश्चात लेकरांचे हाल होतील” असं मनोज जरांगे म्हणाले.
अंतरवली सराटी ते मुंबई अंतर 350 किमीपेक्षा जास्त आहे. एका दिवसात 60 किमी अंतर चालाव लागणार आहे. हे शक्य होईल का? अनेक लोकांना त्रास होऊ शकतो यावर लोकांच्या हिशोबाने चालू असं उत्तर मनोज जरांगे यांनी दिलं. कारण मनोज जरांगे 20 जानेवारीला गावातून निघतील. मुंबईत 26 जानेवारीला पोहोचण्याच लक्ष्य आहे.
टिप्पणी पोस्ट करा