ब्युरो टीम : मराठा आरक्षणाचा आणखीनच चिघळणार असल्याचं दिसत आहे. मनोज जरांगे यांची सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. सरकारकडून गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगरमधील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये जरांगे यांची भेटत अल्टिमेटवबाबत विचार करावा असं म्हटलं होतं. २४ डिसेंबरच्या अल्टिमेटमचा परत एकदा विचार करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली होती. त्यामुळे यावर जरांगे सरकारला वेळ वाढवून देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यावर मनोज जरांगे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले?
समाजाची भूमिका आमची समाजाच्या भूमिकेशी आम्ही प्रामाणिक आहे. आम्हाला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण पाहिजे. सरकार आरक्षण देईलच, नाही दिलं तरी आम्ही लढायला सज्ज आहेत. परंतु त्यांना जो चोवीस डिसेंबपर्यंतचा जो त्यांना वेळ दिलेला आहे. त्यातला एक घंटाही कमी होणार नाही आणि नाही पण त्यांनी वेळ वाढवून मागितलेली आहे. वेळ नाही नाही मी कालच सांगितलं आणि हे मीडियाच्या बांधवाच्या समोर सांगितलं असून मी आडून मी चर्चा करत नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
मी त्यांना सांगितलं जे उपोषण सोडताना आले होते जे लिहिलं होतं कागदावरती ते फक्त तुम्ही एकदा वाचा तुम्ही ते वाचलं की तुम्ही वेळ मागायची गरजच पडणार नाही कारण आणखीन आठ दहा दिवस आहेत तुमच्या हातात तुम्हाला वेळ मागायची गरज पडणार नसल्याचं जरांगे म्हणाले.
आता हा शेवटचा लढा आहे त्यामुळं लढूनच आरक्षण मिळवायचं आहे. दमायचा नाही पर्फेक्ट नियोजन काय जे करायचंय ते नियोजनबद्ध निर्णायक ठोस ठरवून चांगली बांधणी करणार आहोत, जरागेंनी सांगितलं. मराठा संघटना आणि जरांगे यांच्यात तीन तास चालणाऱ्या बैठकीत काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा