Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांनी मुंबईकरांकडून केली अपेक्षा व्यक्त; आंदोलनावेळी ग्लासभर पाणी देतील. मिळून, मिसळून आमच्या मदतीला राहतील”

ब्युरो टीम : मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपाचा खेळ रंगला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “मला बाबा धाकच बसला, त्या माणसाचा. सुस्कृंतपणा आम्ही तुमच्याकडून का शिकावा भुजबळ?. पाय तोडण्याची भाषा करणारे तुम्ही आम्हाला काय शिकवणार?. तुम्ही तुमच बघा, आम्ही आमच बघतो. गोरगरीब धनगर, मुस्लिमांसाठी आम्ही लढणार. गोरगरीब मराठे आणि ओबीसीमध्ये भांडण लावताय तुम्ही. आमचं प्रेम तुटू शकत नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मुंबईत गेल्यावर आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही, असं तुम्ही म्हणता. सरकारला वेळ नाही म्हणता, आणि दुसरीकडे त्यांना वेळ देता, या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “चार दिवस दिले, तेव्हा चार दिवसात कायदा पारित होणार नाही, अस सरकारने सांगितलं. त्यामुळे एक महिन्याचा वेळ दिला. आम्ही कायदा मंजूर करण्यासाठी 40 दिवस दिले. त्यांनी अहवाल तयार केला, स्वीकारला. समजाला फसवण हे माझ्याकडून होणार नाही”

मुंबईकरांबद्दल मनोज जरांगे काय म्हणाले?

मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलनाला बसल्यानंतर वाहतूक कोंडी होईल, सरकारची प्रशासकीय कोंडी होईल. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल. या संबंधी मनोज जरांगे पाटील यांना विचारलं. त्यावर ते म्हणाले की, “आम्ही मुंबईकरांचे आहोत. आम्ही त्यांचे आहोत. गोरगरीबांनी कष्ट केले, मुंबईला भाजीपाला, दूध पुरवलं. ही आमची भावना आहे. भाऊ मरु दिला नाही. पण आता तीच लेकर सुशिक्षित बेरोजगार बनली आहेत. आमच्या वेदाना ते समजून घेतील”

‘ही आमची अपेक्षा’

“स्वत:च्या लेकराला समजून घेतात तसं आम्हालाही समजून घेतील. ते भावना शून्य होणार नाहीत. त्यांचे थोडे हाल होतील. पण ते आम्हाला समजून घेतील ही आमची अपेक्षा आहे. ग्लासभर पाणी देतील. मिळून, मिसळून आमच्या मदतीला राहतील” अस मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मागास आयोगाच्या निकषानुसार, मराठा समाजाला कधीच आरक्षण मिळू शकत नाही, या प्रश्नावर जरांगे पाटील म्हणाले की, “मी ते निकष बघितलेले नाहीत, वाचतो आणि सांगतो. मागास आयोगाने जाचक अटी लावू नये” मनोज जरांगे पाटील हे येत्या 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषणाला बसणार आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने